⚡ ब्रेकिंग News

लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या नवी अपडेट


 लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता, राज्य सरकारचा मोठा निर्णय समोर, जाणून घ्या नवी अपडेट

सामाजिक न्याय विभागाने २७७ कोटी रुपयांचा निधी वितरीत केला; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत, लाभार्थ्यांच्या संख्येत घट

मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये कधी मिळणार, याकडे राज्यातील सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. या महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून, लवकरच ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

२७७ कोटी रुपयांचा निधी वितरीत

सामाजिक न्याय विभागाने फेब्रुवारी महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी २७७ कोटी रुपये महिला व बालविकास खात्याच्या अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. यामुळे राज्य सरकार लवकरच लाभार्थी महिलांना १५०० रुपये देऊ शकते.

जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीत, आता फेब्रुवारीचा कधी?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला व बाल विकास विभागाकडून चालवली जाते. या योजनेतून दरमहा महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा केले जातात. जानेवारी महिन्याचा हप्ता २३ फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला होता. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले होते. सामाजिक न्याय विभागाकडून निधी वितरीत करण्यात आल्याने येत्या काही दिवसांमध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणींना दिली जाऊ शकते.

ई-केवायसी दुरुस्तीची ३१ मार्चपर्यंत संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर काही निकष तयार करण्यात आले होते. त्या निकषानुसार ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल, त्याच लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ घेता येणार होता.

लाभार्थी महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यास सांगितले होते. ई-केवायसी प्रक्रिया मोबाईल किंवा संगणकावरून पूर्ण करायची होती. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करताना काही महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्याचे समोर आले होते. यामुळे ज्या महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले होते, त्यांना दुरुस्तीची संधी ३१ मार्च पर्यंत देण्यात आली आहे. आता ई-केवायसी दुरुस्त करण्यास महिलांकडे केवळ ६ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

ई-केवायसीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत घट

महिला व बालविकास विभागाने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे. काही महिलांनी ई-केवायसी केली नसल्याने त्यांचा लाभ बंद झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

फेब्रुवारीचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता असल्याने राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये उत्सुकता आहे. येत्या काही दिवसांतच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...