⚡ ब्रेकिंग News

रोहित पवारांचा दावा फोल? निवडणूक आयोगातील पत्राबाबत अजित पवार गटातील बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, दादांच्या हयातीतील दाखला देत म्हणाले...


 रोहित पवारांचा दावा फोल? निवडणूक आयोगातील पत्राबाबत अजित पवार गटातील बड्या नेत्याचा गौप्यस्फोट, दादांच्या हयातीतील दाखला देत म्हणाले...

'अधिकार अजितदादांनीच दिले होते, निधनानंतरचे नव्हे'; रोहित पवार संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना आता अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. रोहित पवार केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा पक्षातील एका वरिष्ठ नेत्याने केला आहे.

अधिकार अजितदादांनीच दिले होते'

रोहित पवार यांनी ज्या पत्राचा उल्लेख करून प्रफुल पटेल यांना अधिकार दिल्याचा आरोप केला, त्याबाबत सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले की, निवडणूक आयोग आणि न्यायालयातील कायदेशीर कामकाजासाठी राष्ट्रीय अध्यक्षांना (अजित पवार) प्रत्येक वेळी प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसायचे. त्यामुळे कामकाजात सुसूत्रता यावी, यासाठी अजित पवार यांनीच स्वतः राष्ट्रीय कार्याध्यक्षांना (प्रफुल पटेल) हे अधिकार दिले होते.

निधनानंतरचे नव्हे, हयातीतच दिलेले अधिकार'

निवडणूक आयोगातील सुनावणी आणि कोर्टातील तारखांना राष्ट्रीय अध्यक्षांची सततची उपस्थिती अनिवार्य टाळण्यासाठी हे अधिकार देण्यात आले होते. अजितदादांकडे उपमुख्यमंत्रीपद आणि इतर जबाबदाऱ्या असल्याने, त्यांच्या वतीने प्रफुल पटेल हे कायदेशीर कामकाज पाहत होते.

सूत्रांनी स्पष्ट केले की, हे अधिकार दादांच्या निधनानंतर अचानक दिलेले नसून, ते आधीपासूनच प्रफुल पटेल यांच्याकडे होते, जेणेकरून तांत्रिक कामात खंड पडू नये. अजित पवार स्वतः कोर्टात किंवा निवडणूक आयोगात जात नव्हते, त्यावेळी प्रफुल पटेल यांच्या माध्यमातूनच सर्व अधिकृत कामकाज पाहिले जात होते.

'संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न'

या पत्राचा चुकीचा अर्थ काढून पक्षात फूट पाडण्याचा किंवा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न रोहित पवार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. अजित पवार गटातील नेत्याने रोहित पवार यांच्यावर पलटवार करताना म्हटले की, "अजितदादांच्या हयातीतील कागदपत्रांचा चुकीचा अर्थ लावून जनतेत गैरसमज पसरवले जात आहेत."

रोहित पवारांनी काय म्हटले होते?

काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत खळबळजनक दावे केले होते. ते म्हणाले होते की, २६ फेब्रुवारीला निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या सह्या आहेत. या पत्रात पक्षाचे संविधान बदलल्याचे सांगितले होते. जर पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष नसेल तर नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट (कार्यकारी अध्यक्ष) यांच्याकडे सर्व अधिकार असतील, असा उल्लेख होता.

रोहित पवार पुढे म्हणाले होते की, हे पत्र जेव्हा सुनेत्रा पवार यांना कळाले, तेव्हा त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून राष्ट्रीय अध्यक्ष होईपर्यंत कोणताही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, अशी विनंती केली.

रोहित पवारांचे इतर आरोप

रोहित पवार यांनी याप्रसंगी असेही म्हटले होते की, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल, भाजपच्या काही नेत्यांनी जय पवार यांची पत्रकार परिषद दाबली. तसेच, व्हीएसआर कंपनीला वाचविण्याचे काम सुरू असून, अपघातानंतरही तिला ८० ते ९० कोटी रुपये देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.

आता अजित पवार गटाने या सर्व आरोपांना उत्तर देताना स्पष्ट केले आहे की, संविधानातील बदल आणि अधिकार हे अजित पवारांच्या हयातीतच देण्यात आले होते. त्यामुळे रोहित पवार यांचे आरोप निराधार असल्याचे सांगितले जात आहे. या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...