प्री-ओपनमध्येच मिळालेल्या नकारात्मक संकेतांची पोच; इंडिया VIX वाढल्याने अस्थिरता कायम, गुंतवणूकदार सावध
मुंबई: आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजारात (Stock Market) मोठी घसरण पाहायला मिळाली. सोमवार, २३ मार्च रोजी प्री-ओपन सत्रातच बाजार ८०० ते १००० अंकांनी घसरण्याचे संकेत होते, त्यानुसार प्रमुख निर्देशांक लाल निशाणावर उघडले. तांत्रिक निर्देशांकांनुसार पुढील काळातही बाजारावर दबाव कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण
बीएसई सेन्सेक्स १,४२५ अंकांनी घसरत ७३,१०७ वर आला, तर एनएसई निफ्टी ४६२ अंकांनी घसरून २२,६५२ वर पोहोचला. निफ्टीसाठी तातडीचा सपोर्ट २२,९०० च्या पातळीवर असून, हा स्तर तुटल्यास निर्देशांक २२,२०० च्या दिशेने आणखी घसरण्याची शक्यता आहे. इंडिया VIX सुमारे २२ च्या पातळीवर असल्याने बाजारात अस्थिरता वाढल्याचे दिसून येत आहे. यामुळे दिवसभरात तीव्र चढ-उतार होण्याची शक्यता अधिक आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेत तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
शुक्रवारी कसा राहिला होता बाजार?
याआधी शुक्रवारी (२० मार्च) बाजारात तेजी दिसून आली होती. २० मार्च रोजीच्या सत्रात सेन्सेक्स ३२५.७२ अंकांनी (०.४४%) वाढून ७४,५३२.९६ वर बंद झाला होता. निफ्टी ५० देखील ११२.३५ अंकांच्या (०.४९%) वाढीसह २३,११४.५० वर स्थिरावला होता. शुक्रवारी बीएसईमधील टेक महिंद्रा, टाटा स्टील, ट्रेंट, रिलायन्स आणि एनटीपीसी हे टॉप गेनर ठरले होते, तर एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, इंडिगो आणि अॅक्सिस बँक या शेअर्समध्ये घसरण झाली होती.
सेक्टरनिहाय पाहता, निफ्टी १००, ऑटो, स्मॉलकॅप १००, एफएमसीजी, आयटी आणि मिडकॅप १०० निर्देशांकात तेजी होती, तर निफ्टी बँक निर्देशांकात कमजोरी दिसून आली होती. बीएसईमधील २१ शेअर्स वाढीसह बंद झाले होते, तर ९ शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली होती.
एकूणच, शुक्रवारी मिळालेली तेजी टिकवण्यात बाजार अपयशी ठरल्याचे चित्र आज दिसून आले. प्री-ओपनमधील मोठी घसरण आणि नकारात्मक जागतिक संकेत लक्षात घेता, आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी अस्थिर ठरण्याची शक्यता असून, सावधगिरीने व्यवहार करणे गरजेचे मानले जात आहे..
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.