चाकणनंतर आता राजगुरुनगरमध्ये हल्ल्याची घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नगरपरिषदेवर उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरात भटक्या कुत्र्यांच्या टोळीने केलेल्या हल्ल्यात एका कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वीच चाकण परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याचे या घटनेने स्पष्ट झाले आहे. लहान मुले आणि नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, नगरपरिषदेकडून ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि वारंवार होणारे हल्ले यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
२. भारत मंडपम कन्वेक्शन सेंटरवरून विवाद (पुणे)
उद्यान-हॉस्पिटलसाठी आरक्षित ४८ एकर जागेवर भारत मंडपम कन्वेक्शन सेंटर? भाजपच्या घाटाविरोधात सजग नागरिक मंचाचा इशारा
महापालिकेत आज सादर होणार प्रस्ताव; ‘प्रस्ताव मंजूर झाल्यास कोर्टात जाणार’, विवेक वेलणकर यांची भूमिका; आमदार सुनील कांबळे यांचा पाठपुरावा
पुण्यात उद्यान, हॉस्पिटल, भाजी मंडई यासाठी आरक्षित असलेल्या ४८ एकर जागेवर भारत मंडपम कन्वेक्शन सेंटर उभारण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केला आहे. महापालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव दिला जाणार आहे.
पुण्यातील कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे यांनी राज्य सरकारकडे या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला आहे. लोहगाव परिसरातील ही जागा मूलभूत गरजांसाठी आरक्षित असताना कन्वेक्शन सेंटरसाठी का द्यावी, असा सवाल सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केला आहे. या परिसराचे आमदार राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे बापू पठारे असून, त्यांनी या जागेसाठी राज्य सरकारला पत्र का दिले नाही, असाही प्रश्न वेलणकरांनी उपस्थित केला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास ते कोर्टात जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
३. मगरपट्टा सिटीजवळ कॅनल फुटल्याने वाहतूक कोंडी (पुणे)
हडपसरमध्ये कॅनल फुटल्याने मोठी वाहतूक कोंडी; मगरपट्टा सिटीकडे जाणारे रस्ते बंद
वाहतूक पोलिसांनी बॅरिगेटिंग लावत माइकद्वारे सूचना सुरू; नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज
पुण्यातील हडपसर परिसरातील मगरपट्टा सिटी जवळ कॅनल फुटल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. हडपसर चौकातून मगरपट्टा सिटीकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले असून, वाहतूक पोलिसांनी बॅरिगेटिंग लावले आहे.
वाहतूक पोलिसांकडून माइकद्वारे नागरिकांना सूचना देण्यात येत आहेत. नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.