⚡ ब्रेकिंग News

महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा बॉलिवूड लूक; गोव्यात फिरताना दिसताच साध्वी बनलेली ममता ट्रोल, व्हायरल व्हिडिओ

महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा बॉलिवूड लूक; गोव्यात फिरताना दिसताच साध्वी बनलेली ममता ट्रोल, व्हायरल व्हिडिओ

संन्यासानंतर पहिल्यांदाच मॉडर्न अवतारात दिसली अभिनेत्री; नेटकऱ्यांचे प्रश्न – ‘संन्यासीजी भूत निघून गेले का?’, ‘पुन्हा ग्लॅमरच्या दुनियेत परतीचा डाव?’

९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये बोल्ड अदांनी गाजवलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी महाकुंभमेळ्यात तिने संन्यास घेत सर्वांनाच धक्का दिला होता. भगवे वस्त्र परिधान करून ती अध्यात्माच्या मार्गावर गेली होती. मात्र, आता तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात ती गोव्यात मित्रपरिवारासोबत मॉडर्न लूकमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे. या व्हिडिओनंतर तिला नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.

गोव्यात मॉडर्न लूकमध्ये ममता

ममता कुलकर्णी सध्या गोव्यात सुट्टी घालवत आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, त्यात ती डेनिम जॅकेट आणि गॉगल अशा मॉडर्न अवतारात दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती आपल्या मित्रपरिवारासह रेस्टॉरंटमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. संन्यास घेतल्यानंतर तिने पहिल्यांदाच असा ग्लॅमरस लूक कॅरी केल्यामुळे हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.

नेटकऱ्यांकडून ट्रोल

ममताच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तिच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

 एका नेटकऱ्याने प्रश्न केला, “काही काळापूर्वी संन्यासाच्या मार्गावर असलेली ही अभिनेत्री आता पुन्हा ग्लॅमरसच्या दुनियेत परतत आहे का?”

 दुसऱ्या युझरने ट्विस्टेड कमेंट करत लिहिले, “संन्यासीजी भूत निघून गेले का?”

 तर काहींनी विचारले, “तुम्ही आधी साध्वी झाला होतात, मग आता पुन्हा त्याच अंदाजात का परतलात?”

पुन्हा ग्लॅमरच्या दुनियेत?

माहितीनुसार, ममता कुलकर्णीने महामंडलेश्वरपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तिने संन्यास खरंच सोडला का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘लाफ्टर शेफ’ या शोच्या सेटवर साडीत दिसली होती. त्यानंतर आता गोव्यातील मॉडर्न लूक पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे. ती पुन्हा एकदा ग्लॅमरसच्या दुनियेत पाऊल ठेवणार का, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...