⚡ ब्रेकिंग News

‘दोन-चार व्हिडीओ जोडून बनवला आहे’ - नरहरी झिरवळांच्या कथित व्हिडीओवर मुख्यमंत्र्यांनी खोला पत्ते; सत्यता तपासून निर्णय घेणार

व्हायरल व्हिडीओ प्रकरणात राजीनाम्याची मागणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले - चौकशी होईल, सुनेत्रा पवारांसोबत योग्य तो निर्णय घेऊ

मुंबई: राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हायरल व्हिडीओवरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “नरहरी झिरवाळ यांनी मला फोन करून सांगितले की, हा व्हिडीओ दोन-चार वेगवेगळ्या व्हिडीओ एकत्र जोडून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे याची सत्यता तपासली जाईल.”

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “मी त्यांना सल्ला दिला की, तात्काळ तक्रार दाखल करा. व्हिडीओची शाहनिशा (सत्यता तपासणी) केली जाईल. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि आम्ही मिळून योग्य तो निर्णय घेऊ.”

राजीनाम्याची मागणी

नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडीओमध्ये शासकीय निवासस्थानात एक महिला आणि दारूच्या बाटल्या दिसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या व्हिडीओमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीतील एका गटाकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 पार्श्वभूमी

नरहरी झिरवाळ यांच्यावर यापूर्वी एफडीए विभागातील लाचखोरी प्रकरणात आरोप झाले होते. मात्र, चौकशीत त्यांचा कोणताही संबंध नसल्याचे आढळून आल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली होती.

सध्याचा व्हिडीओ प्रकरण गंभीर असल्याचे मानले जात असून, त्याची सत्यता तपासल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप झिरवाळ यांचा राजीनामा घेण्याची भूमिका नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. आरोप झाले तरी लगेच राजीनामा घेणे योग्य नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.

सध्या हा मुद्दा राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. व्हिडीओची सत्यता तपासणी काय निष्पन्न करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...