⚡ ब्रेकिंग News

‘मी शंकराचा अवतार, तू माझी पार्वती’... पुण्यातील महिलेवर अध्यात्माच्या नावाखाली अत्याचार; वसईच्या भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा शोध घेण्यासाठी ४ पथके तैनात

स्वतःला शंकराचा अवतार सांगून महिलेचा विश्वास संपादन करून गुंगीचे औषध देऊन अत्याचार; फोटो-व्हिडीओने ब्लॅकमेल; आरोपी फरार, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

वसई: अध्यात्मिक साधनेच्या नावाखाली पुण्यातील एका ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात वसईतील भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य याच्या शोधासाठी पोलिसांनी जोरदार मोहीम सुरू केली आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी ४ वेगवेगळी पोलिस पथके मैदानात उतरली आहेत. यामध्ये पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याची दोन पथके आणि वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्याची दोन पथके सहभागी आहेत.

पीडित महिलेने बुधवारी सायंकाळी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ऋषिकेश वैद्य याने २०२३ मध्ये सोशल मीडियावरून तिच्याशी संपर्क साधला. स्वतःला ‘शंकराचा अवतार’ म्हणवून आणि महिलेला ‘तू माझी पार्वती आहेस’ असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला.

नंतर पुण्यात भेट घेतल्यावर लॉजमध्ये नेून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप आहे. वसईतही त्याने पुन्हा अत्याचार केला. यानंतर आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढून २०२५ पर्यंत तिला ब्लॅकमेल केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह

माणिकपूर पोलिसांनी तक्रारीनंतर ‘झिरो नंबर’वर गुन्हा दाखल केला आणि प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्याकडे वर्ग केले. मात्र, गुरुवारी तातडीने कारवाई न केल्यामुळे आरोपीला फरार होण्याची संधी मिळाली, असा आरोप होत आहे. सध्या आरोपी पूर्णपणे फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी चार पथके सक्रिय आहेत.

 आरोपीचे सोशल मीडिया वक्तव्य

फरार असतानाही ऋषिकेश वैद्य याने फेसबुक आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर पोस्ट केली आहे. त्यात त्याने म्हटले आहे,  

“माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच सत्य बाहेर येईल. सत्यमेव जयते.”

या प्रकरणात पीडितेच्या गंभीर आरोपांविरुद्ध आरोपीचा ‘खोटा गुन्हा’ असल्याचा दावा, यामुळे सत्य काय आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पोलिस या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र करत आहेत. आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यातील कथित निष्काळजीपणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही टीका होत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...