⚡ ब्रेकिंग News

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा डाव; मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर, उज्ज्वल निकम यांच्या सुपुत्राला मोठी जबाबदारी


  राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा मोठा डाव; मुंबई प्रदेश कार्यकारिणी जाहीर, उज्ज्वल निकम यांच्या सुपुत्राला मोठी जबाबदारी

 विनोद शेलार, अनिकेत निकम यांच्यासह नव्या चेहऱ्यांना संधी; किरण शेलार, रवी राजा यांची उपाध्यक्षपदी वर्णी

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली सुरू असतानाच भारतीय जनता पक्षाने (भाजप) मुंबई प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. गुरुवारी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली. याद्वारे पक्षाने अनेक जुन्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देतानाच वरिष्ठ नेते उज्ज्वल निकम यांचे सुपुत्र अनिकेत निकम यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या मुंबई प्रदेश कार्यकारिणीत किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव आणि अमरजित मिश्रा यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर आणि विनोद शेलार यांना महामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. किरीट बन्साळी यांची कोषाध्यक्षपदी तर दीपक सिंह यांची युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

विशेष म्हणजे, मुंबई भाजपचे प्रवक्तेपदी अनिकेत निकम यांच्यासह निरंजन शेट्टी, अजय सिंह आणि सुमिता सिंह यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी काही दिवसांआधीच भाजपने राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली होती. त्यात नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तेपदी, तर कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. चित्रा वाघ यांची महिला मोर्चा अध्यक्ष तर योगेश टिळेकर यांची ओबीसी मोर्चा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

मुंबई प्रदेश कार्यकारिणी (महत्त्वाची पदे):

उपाध्यक्ष: किरण शेलार, रवी राजा, अभिजित सामंत, पंकज यादव, अमरजित मिश्रा

महामंत्री: राजेश शिरवडकर, पवन त्रिपाठी, श्वेता परुळेकर, विनोद शेलार

कोषाध्यक्ष: किरीट बन्साळी

युवा मोर्चा अध्यक्ष: दीपक सिंह

प्रवक्ते: अनिकेत निकम, निरंजन शेट्टी, अजय सिंह, सुमिता सिंह

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...