भायखळ्याच्या प्राणिसंग्रहालयाला चार वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा; सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून आशियाई सिंहाची जोडी मिळावी यासाठी पाठपुरावा
मुंबईतील भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील प्राणिसंग्रहालयाला गेल्या चार वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा असलेल्या प्रतीक्षेला आता गती मिळण्याची चिन्हे आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी यासाठी पुढाकार घेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना पत्र पाठवून आशियाई सिंहाची जोडी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
महापौर रितू तावडे यांनी पाठवलेल्या पत्रात मुंबईतील प्राणिसंग्रहालय हे शहरातील प्रमुख आकर्षण असून दररोज मोठ्या संख्येने पर्यटक व विद्यार्थी येथे भेट देतात, असे नमूद केले आहे. प्राणिसंग्रहालयातील जैवविविधता वाढवण्यासाठी तसेच पर्यटकांचे आकर्षण वाढवण्यासाठी आशियाई सिंहाची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. विशेषतः गुजरातमधील जुनागढ येथील सक्करबाग प्राणिसंग्रहालयातून ही सिंहाची जोडी उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
महापौरांनी या पत्रात गुजरात सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच यासंदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. सिंहाच्या देवाणघेवाणीबाबत बोलले जात असून गुजरातकडून सिंह मिळाल्यास त्याबदल्यात पेंग्विनसह इतर काही पक्षी देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. यासंदर्भात पक्ष्यांची यादीही सादर करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्राणिसंग्रहालयात सध्याची स्थिती:
सध्या या प्राणिसंग्रहालयात शक्ती आणि करिश्मा या वाघाच्या जोडीसह अस्वल, हरणे, अजगर, तरस यांचा समावेश आहे. तसेच पेंग्विन, हत्ती, माकडे, विविध प्रकारचे पक्षी अशी प्राण्यांची रेलचेल आहे. येथे १३ जातीचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. तर २८३ प्रजातींचे ६६११ वृक्ष-वनस्पतीही या उद्यानात आहेत. रंगीत करकोचा, छत्रबलाक, बगळे, सारस असे पाणथळ पक्षीही पर्यटकांचे आकर्षण ठरतात.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.