⚡ ब्रेकिंग News

अंबानींच्या लेकीचा ऑस्करवाला ग्रँड डेब्यू; स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये ईशाने हॉलिवूड स्टार्सनाच फिके केले

अंबानींच्या लेकीचा ऑस्करवाला ग्रँड डेब्यू; स्ट्रॅपलेस गाऊनमध्ये ईशाने हॉलिवूड स्टार्सनाच फिके केले

व्हिंटेज व्हॅलेंटिनो गाऊन आणि डायमंड ज्वेल्समध्ये ईशाची दिमाखदार एंट्री; चाहते म्हणाले, "हॉलिवूडला मागे टाकलं"

लॉस एंजेलिस : ९८ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर यंदा भारताच्या अब्जाधीश कुटुंबातील सून आणि लेकीने आपल्या अदांनी हॉलिवूडच्या ताऱ्यांनाच फिके केले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिने पती आनंद पिरामल यांच्यासमवेत ऑस्करच्या रेड कार्पेटवर पदार्पण केले. न्यूयॉर्कमधील 'मेट गाला'सारख्या कार्यक्रमांमध्ये ती यापूर्वीही चमकली असली, तरी ऑस्करच्या व्यासपीठावरील ही तिची पहिलीच उपस्थिती होती.

कसा होता ईशाचा लूक?

ईशाने या सोहळ्यासाठी फॅशन आणि परंपरा यांची अनोखी सांगड घातली. तिने व्हॅलेंटिनोच्या हॉट कॉउचर फॉल/विंटर २००६-२००७ कलेक्शनमधील व्हिंटेज स्ट्रॅपलेस गाऊन वेअर केला होता. ब्लॅक आणि क्रीम रंगाच्या या गाऊनवर फुलांचे बारीक भरतकाम केलेले होते, ज्यामुळे तो अत्यंत आकर्षक दिसत होता. आपला लूक आणखी खुलवण्यासाठी ईशाने लोरेन श्वार्ट्झ यांनी डिझाइन केलेला डायमंड चोकर आणि मॅचिंग कानातले घातले होते. या लूकसह ती रेड कार्पेटवर उतरताच सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

रेड कार्पेटवर पाऊल ठेवण्यापूर्वी ईशाने अकादमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्सलाही भेट दिली. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आणि जागतिक सिनेमॅटिक संस्थांमधील परस्पर सहकार्याला चालना देण्यासाठी ही भेट होती.

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

ईशाच्या या ग्लॅमरस अंदाजाचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. एका चाहत्याने लिहिले, "ईशा अंबानी आपल्या लूकने भल्याभल्या हॉलिवूड स्टार्सनाही टक्कर देत आहेत. ती खरोखरच अतिशय सुंदर दिसतेय." तर दुसऱ्या यूजरने कमेंट केली, "या लूकसह तिने संपूर्ण हॉलिवूडलाच मागे टाकले आहे." आणखी एका चाहत्याने म्हटले, "ईशा अंबानी यांनी आपल्या अदांनी हॉलिवूडच्या सुंदरींनाही फिके पाडले."

यावेळी ऑस्कर सोहळ्यात बॉलिवूडची आंतरराष्ट्रीय स्टार प्रियांका चोप्रा यांनीही रेड कार्पेट गाजवले. पण ईशाच्या पदार्पणाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ईशा अंबानीचा हा ग्रँड डेब्यू आता जगभरात चर्चेचा विषय बनला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...