सांगली : तब्बल सात ते साडेसात वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आज शांततेने पार पडली. तुटलेल्या 'मिनी मंत्रालयाचा' जनतेशी पुन्हा संपर्क साधला जाणार आहे. जवळपास १८ लाखाहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. गेल्या आठवडाभर सर्व पक्षांच्या नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवला होता.
जिल्हा परिषदेसाठी ६१ गटांवर २११ उमेदवार तर दहा तालुक्यांतील पंचायत समितीच्या १२२ जागांसाठी ३४० उमेदवार रिंगणात आहेत. महिनाभर रणधुमाळी सुरू होती. प्रचाराचा धुरळा खाली बसला असताना, मतदान दोन दिवसांनी पुढे ढकलण्यात आले. मायाबाबूंच्या चिंचणी यात्रेमुळे निवडणुकीत उशीर झाल्याचा आरोप झाला होता. मात्र, अचानक महाराष्ट्राचे लाडके नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे हे दोन दिवस पुढे ढकलले गेले. त्यानंतर आज संपूर्ण जिल्ह्यात मतदान सुरळीतपणे पार पडले.
सत्ताधारी भाजप ५० जागा लढवत आहे. बहुमतासाठी ३१ जागांची गरज आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ३२ ते ४२ जागा जिंकण्याचा दावा केला आहे. जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे दोन, काँग्रेस आणि एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रत्येकी एक आमदार आहेत. स्थानिक नेतृत्वाची ताकदही जोडली गेली आहे. त्यामुळे ही निवडणूक 'तुळशीची' ठरली आहे.
राज्यातील महायुतीत भाजप मोठा भाऊ आहे, त्यासोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे गटाची शिवसेना. महापालिका निवडणुकीत तीनही पक्ष स्वतंत्र लढले, भाजपचे संख्याबळ बहुमताच्या काठावर थांबले. त्यांना घटक पक्षांची साथ घेऊन सत्ता मिळवावी लागली. जिल्हा परिषदेतही अशी पुनरावृत्ती होऊ शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कामगिरीकडे लक्ष आहे.
महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उद्धव गट) ची ताकद किती दिसेल, याची उत्सुकता आहे. नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन नगरपालिका जिंकल्या. महापालिकेत काँग्रेसने १८ जागा मिळवल्या, राष्ट्रवादीला (शरद पवार गट) फक्त तीन (गेल्या वेळी २४).
२०१७ च्या निवडणुकीत १६ लाख ३१४७ मतदार होते, यंदा हा आकडा १८ लाख ७१९ झाला. १३ टक्के मतदान वाढले. यात ९ लाख २३ हजार ९११ पुरुष, ८ लाख ९४ हजार ७६६ महिला आणि ४२ इतर मतदार. सोमवारी (९ फेब्रुवारी) मतमोजणी होईल. दुपारपर्यंत मिनी मंत्रालय कोणाच्या ताब्यात जाईल, हे स्पष्ट होईल.
.jpeg)
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.