⚡ ब्रेकिंग News

प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २१ कोटींचा निधी द्यावा – महेश करचे यांचे ग्रामविकास मंत्री गोरे यांना आवाहन

म्हसवड : प्रतिनिधी

माण-खटावचे लोकप्रतिनिधी व राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण-खटाव तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी कुकुडवाड गटातील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार महेश करचे यांनी केली. सोलापूर जिल्ह्यात जाहीर केलेली निधी योजना सातारा जिल्ह्यातही राबवावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय व विकासात्मक दिशा स्पष्ट करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर उपस्थित होते.

कुकुडवाड गटाची निवडणूक जिल्ह्यात विशेष लक्षवेधी ठरली, असे करचे म्हणाले. मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर झाल्याच्या चर्चा असल्या तरी जनतेने दिलेला निकाल आम्ही मान्य करतो. आता मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी मिळून सर्वांगीण विकासासाठी काम करणे गरजेचे आहे. विजयी उमेदवार अनिल देसाई व पराभूत अरुण गोरे यांनी विकासासाठी भूमिका मांडली असून, त्याचे स्वागत आहे. मात्र विकासाची ठोस दिशा, नियोजन व कालमर्यादा स्पष्ट करावी. मी स्वतः गटातील प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असून, गरज पडल्यास आंदोलनात्मक भूमिकाही घेणार, असे त्यांनी नमूद केले.

सोलापूर जिल्ह्यातील प्रचारादरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटाला २१ कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. तीच योजना सातारा जिल्ह्यात, विशेषतः माण-खटाव तालुक्यात राबवावी, असे करचे यांनी ठामपणे सांगितले. माण-खटाव तालुक्यात त्यांच्या पक्षाला चांगले यश मिळाले असून, विजयी न झालेल्या ठिकाणीही मोठे मतदान मिळाले. कोणताही भेदभाव न करता सर्व गटांना समान निधी देऊन विकास गतीमान करावा, ही आमची मागणी आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...