⚡ ब्रेकिंग News

चिमुकल्याची 128 दिवस मृत्यूशी झुंज; कफ सिरपमुळे अवयव निकामी, अखेर मालवली प्राणज्योत

 

MP NEWS: मध्य प्रदेशच्या छिंदवाडा इथल्या विषारी कफ सिरप प्रकरणात आणखी एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. नागपुरातील रुग्णालयात चार वर्षीय मुलाने अखेरचा श्वास घेतला आहे. हर्षच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.


मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया इथं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घडलेल्या कोल्ड्रिफ कफ सिरप घोटाळ्याशी संबंधित दु:खद बातमी समोर आली आहे. कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे गंभीर आजारी पडलेल्या बैतुल जिल्ह्यातील एका चार वर्षांच्या मुलाचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला आहे. नागपूरमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत या मुलावर उपचार सुरू होते. या चिमुकल्याने तब्बल 128 दिवस मृत्यूशी झुंज दिली होती. अखेर रविवारी 1 फेब्रुवारी रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. चार वर्षांचा हर्ष हा मूळचा मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया इथला होता. 26 सप्टेंबर रोजी त्याला नागपूरच्या एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...