'वन बॅटल आफ्टर अनदर'ला 6, तर 'सिनर्स'ला 4 ऑस्कर; भारतीय सिनेमांच्या पारड्यात काय?
ऑस्कर २०२६ च्या व्यासपीठावर हॉलिवुडचे वर्चस्व; प्रियांका चोप्राने पुरस्कार वितरण केले, भारतीय सिनेमे मात्र राहिले मागे
लॉस एंजेलिस : जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असलेल्या ९८व्या ऑस्कर पुरस्कार २०२६ चा सोहळा लॉस एंजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. या वर्षीच्या सोहळ्यात 'वन बॅटल आफ्टर अनदर' आणि 'सिनर्स' या चित्रपटांनी आपलं वर्चस्व गाजवलं. मात्र, भारतीय सिनेमांना या व्यासपीठावर मागे राहावे लागले.
'वन बॅटल आफ्टर अनदर' या चित्रपटाने एकूण १३ नामांकनांपैकी ६ ऑस्कर पटकावले. यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पॉल थॉमस अँडरसन), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (शॉन पेन), सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा, सर्वोत्कृष्ट कास्टिंग आणि सर्वोत्कृष्ट संपादन या पुरस्कारांचा समावेश आहे. तर 'सिनर्स' या चित्रपटाने ४ ऑस्कर पटकावले. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (मायकेल बी जॉर्डन), सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा (रायन कूगलर), सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (ऑटम डुरल्ड अर्कापॉ) यांचा समावेश आहे.
ऑस्कर २०२६ चे प्रमुख विजेते:
सर्वोत्कृष्ट चित्रपट : वन बॅटल आफ्टर अनदर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : पॉल थॉमस अँडरसन - वन बॅटल आफ्टर अनदर
सर्वोत्कृष्ट अभिनेता : मायकेल बी जॉर्डन - सिनर्स
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : जेसी बकले - हैमनेट
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : शॉन पेन - वन बॅटल आफ्टर अनदर
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : एमी मॅडिगन - वेपन्स
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा : रायन कूगलर - सिनर्स
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा : पॉल थॉमस अँडरसन - वन बॅटल आफ्टर अनदर
सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट : सेंटिमेंटल व्हॅल्यू
सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट : के-पॉप डेमन हंटर्स
सर्वोत्कृष्ट छायाचित्रण : ऑटम डुरल्ड अर्कापॉ - सिनर्स
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : अवतार: फायर अँड ऐश
सर्वोत्कृष्ट मूळ गीत : गोल्डन (के-पॉप डेमन हंटर्स)
भारतीय सिनेमांचे काय झाले?
ऑस्करच्या या सोहळ्यात भारतीय सिनेमे मात्र पुरस्कारांच्या शर्यतीत मागे राहिले. यंदा कोणत्याही भारतीय चित्रपटाला ऑस्करच्या नामांकनात स्थान मिळू शकले नाही. मात्र, जागतिक कीर्तीची भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी या सोहळ्यात पुरस्कार वितरणाची भूमिका बजावून भारतीय वंशाचे प्रतिनिधित्व केले. तसेच सलग दुसऱ्या वर्षी कॉमेडियन कोनन ओ'ब्रायन यांनी या सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं.
या सोहळ्याच्या रेड कार्पेटवर जगभरातील सिनेताऱ्यांनी आपल्या ग्लॅमरस अंदाजाने उपस्थितांची मने जिंकली. ऑस्कर २०२६ मध्ये हॉलिवुडचं वर्चस्व तर दिसून आलंच, मात्र भारतीय सिनेमांसाठी हा सोहळा निराशेचा ठरला.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.