दुसऱ्या पुरुषासोबत हलाला करुन ये मगच तुला..., लग्न होताच नव्या नवरीच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर... तलाक देत महिलेसोबत नवरा आणि सासरच्यांकडून घाणेरडं कृत्य... धक्कादायक आहे घडलेली घटना...
गेल्या काही दिवसांपासून विवाहित महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. सासरच्या होणाऱ्या जाचाला कंटाळून अनेक महिलांनी तर स्वतःचं आयुष्य देखील संपवलं आहे. आता देखील एका महिलेसोबत घडलेली धक्कादायक घटना समोर येत आहे. महिला लग्न होऊन सासरी गेली. सुखी संसाराचे स्वप्न पाहिलेल्या महिलेच्या नशिबात मात्र काही भयानक लिहिलेलं होतं. लग्नात मिळालेला हुंडा आवडला नाही म्हणून सासरच्या मंडळींनी महिलेसोबत वाईट कृत्य करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर, नवऱ्याने तलाक देत महिलेला दुसऱ्या पुरुषासोबत हलाला करुन ये… त्यानंतरच तुला स्वीकारेल… अशी अट ठेवली… अखेर सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून महिलेने पोलिसांत तक्रार केली आणि धक्कादायक घटना समोर आली.
संबंधित घटना उत्तर प्रदेश येथील बांदा येथील आहे… जेथे लग्नानंतर एका महिलेला शारीरिक आणि मानसिक त्रास सासरच्यांकडून दिला जात होता. एवढंच नाही तर, पुन्हा नांदायचं असेल तर, सासरच्या मंडळींनी महिलेपुढे हलाला करण्याची अट घातली. ज्यामुळे त्रासलेल्या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पतीसह चार जणांवर हुंड्यासाठी त्रास, मारहाण आणि अन्य गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.