⚡ ब्रेकिंग News

कौठुळीत भाजपचा 'शंखनाद'; श्रीरंग अण्णा कदम यांचा पक्षप्रवेश! ​कौठुळी: गावाच्या

 कौठुळी: गावाच्या राजकीय पटलावर आज मोठा फेरबदल झाला. श्रीरंग अण्णा कदम यांनी आपल्या समर्थकांसह अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश


केला आहे. या निर्णयामुळे कौठुळी गावाने भाजपला एकहाती पाठिंबा जाहीर केला असून, गावात आता भाजपच्या एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे.

​श्रीरंग अण्णा कदमांच्या भाजप प्रवेशाने कौठुळीत राजकीय समीकरणे बदलली जाणार असून दिघंची गटाचा निकाल एका बाजूने झूकेल काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

 यावेळी आमदार माननीय गोपीचंद पडळकर तसेच आटपाडीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यु टी जाधव सर यांच्यासह दिघंची जिल्हा परिषद गटाचे उमेदवार कल्लापा कुटे नाना तसेच विठलापूर गणाचे उमेदवार वैभव हेगडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

 निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून भारतीय जनता पार्टीमध्ये तालुक्यातील बरेचसे ज्येष्ठ नेते ज्यांचा आपल्या परिसरामध्ये चांगला नावलौकिक आहे एक हक्काचा मतदार आहे असे स्थानिक नेते भाजपाच्या गोटामध्ये येत असल्यामुळे विरोधी पक्षाच्या गोटात या प्रवेशामुळे मात्र खळबळ सुरू आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...