⚡ ब्रेकिंग News

कोल्हापूर मतदान केंद्रावर गोंधळ; ठाकरे गट नेत्याने EVM फोडली, पोलिसांनी ताब्यात घेतलं

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील नाधवडे मतदान केंद्रावर शनिवारी दुपारी EVM मशीन फोडण्याचा धक्कादायक प्रकार घडला. बॅलट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी शिवसेना (ठाकरे गट) ग्राहक सेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांनी मतदान केल्यानंतर EVM जमिनीवर आपटून फोडली. या घटनेमुळे केंद्रावर तणाव निर्माण झाला.

EVM फोडण्यापूर्वी आक्षेपार्ह पोस्ट

जयवंत वायदंडे यांनी सोशल मीडियावर निवडणूक प्रक्रियेवर शंका उपस्थित करणारी पोस्ट शेअर केली होती. साडेतीन वाजता मतदान करून बाहेर पडताच त्यांनी EVM जोरात जमिनीवर फेकली. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला. पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी त्यांना ताब्यात घेतलं. परिस्थिती नियंत्रणात येताच मतदान सुरळीत सुरू झालं. रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.

जिल्ह्यात ७४.३५% मतदान

कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत ७४.३५ टक्के मतदान झालं. सोमवारी (९ फेब्रुवारी) निकाल जाहीर होईल.

दोन गावांनी मतदानावर बहिष्कार

राज्यातील निवडणुकीत दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला. तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात सोलर प्रकल्पासाठी वृक्षतोड झाल्याच्या निषेधार्थ, तर परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथ गावात रस्ता आणि नदी पुलाच्या मागणीसाठी मतदारांनी एकही मत नोंदवलं नाही. मनधरणीचे प्रयत्न अयशस्वी ठरले.



Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...