महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिली घटना! शरद पवार प्रत्यक्ष हजर नसताना घरी जाऊन भरला अर्ज; निवडणूक अधिकाऱ्यांकडून शपथ घेतली
तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार उपस्थित राहू शकले नाहीत; सुप्रीम कोर्टाच्या १९६८ च्या निवाड्यानुसार घरच्याघरी पूर्ण केली प्रक्रिया
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे, की एखाद्या उमेदवाराला राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहता आले नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना तब्येतीच्या कारणामुळे अर्ज दाखल करण्यासाठी येणे शक्य झाले नाही. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनीच त्यांच्या घरी जाऊन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
कशी पार पडली प्रक्रिया?
सुप्रीम कोर्टाच्या १९६८ च्या पशुपतीनाथ विरुद्ध हरिहर प्रसाद सिंग या निवाड्यानुसार, आरोग्यासह कुठल्याही वैध कारणास्तव उमेदवार प्रत्यक्ष उपस्थित नसेल तर संविधानाच्या कलम ८४ अ प्रमाणे विहीत नमुन्यात शपथपत्र सादर करणे अनिवार्य असते. त्यानुसार जेजे रुग्णालयाचे अधीक्षक संजय सुरवसे यांनी आज शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवारांचे प्रस्तावक जयंत पाटील यांनी सदर अर्ज विधीमंडळात येऊन निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला.
खबरदारी म्हणून दोन अर्ज
शरद पवार यांनी खबरदारी म्हणून दोन अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून. एकादा अर्ज बाद झाला तरी दुसरा अर्ज कायम राहावा यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चार, राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून पार्थ पवार, शिवसेना (शिंदे गट) कडून ज्योती वाघमारे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी अर्ज दाखल केले आहेत. सात जागांसाठी सातच उमेदवार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील उमेदवार यादी:
भाजप: रामदास आठवले, विनोद तावडे, माया चिंतामण ईवनाते, रामराव वडकुते
शिवसेना (शिंदे गट): ज्योती वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट): पार्थ पवार
महाविकास आघाडी: शरद पवार
तब्येतीच्या कारणामुळे शरद पवार प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत आणि निवडणूक अधिकाऱ्यांनीच घरी जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.