नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात यांच्या अघोरी कृत्ये आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासात विशेष तपास पथकाने (SIT) आता मोठा वळण घेतले आहे. खरातने स्थापन केलेल्या ‘शिवनिका’ संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहार आणि कार्यक्रमांवर एसआयटीने लक्ष केंद्रित केले असून, संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचीही एसआयटीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यांना लवकरच समन्स बजावले जाणार असल्याचे समजते.
‘शिवनिका’ संस्थेच्या विश्वस्त मंडळात खरात दांपत्यासह रुपाली चाकणकर यांचेही नाव आहे. या संस्थेच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहार, निधीचा वापर आणि खरातला मिळालेले पाठबळ याचा तपास एसआयटी करत आहे. संस्थेच्या बँक खात्यांचे तपशील आणि मागील काही वर्षांतील सर्व व्यवहारांची कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
कोणकोण चौकशीच्या फेऱ्यात?
एसआयटी ‘शिवनिका’ संस्थेच्या सर्व आजी-माजी सदस्यांना चौकशीसाठी बोलवणार आहे. यामध्ये खरातशी संबंधित ‘पांढरपेशी’ चेहऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘शिवनिका’ संस्थेच्या विश्वस्त मंडळातील प्रमुख नावे:
कॅप्टन अशोककुमार एकनाथ खरात
डॉ. जितेंद्र गणपतराव शेळके
सौ. कल्पना अशोककुमार खरात
ना. सौ. रूपाली निलेश चाकणकर
श्री. सुभाषराव केशवराव जमे
श्री. ललित प्रकाश गोफणे (सी.ए.)
डॉ. नंदकिशोर तुकाराम काटोरे
अशोक खरात प्रकरणात आधीच वादात सापडलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एसआयटी आता संस्थेच्या निधीचा वापर, आर्थिक लेन-देन आणि संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा सखोल अभ्यास करत आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.