⚡ ब्रेकिंग News

कौटुंबिक वाद टोकाला, पोटात चाकू खुपसल्याने वडिलांचा मृत्यू; नाशिकमध्ये थरारक घटना

कौटुंबिक वाद टोकाला, पोटात चाकू खुपसल्याने वडिलांचा मृत्यू; नाशिकमध्ये थरारक घटना

पंचवटीत मुलानेच जन्मदात्यावर केला प्राणघातक हल्ला; दीड महिना रुग्णालयात उपचार सुरू होते, अखेर मृत्यूने घेतली साथ, आरोपी मुलाला अटक

नाशिक: नाशिकच्या पंचवटी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका मुलाने आपल्या वडिलांवर चाकूने हल्ला केला, ज्यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांनी दीड महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर अखेरचा श्वास घेतला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

पेठ रोडवरील नवनाथनगर, रोकडे चाळ परिसरात सखाराम पंडित भावसार (वय 65) हे आपल्या कुटुंबासह राहत होते. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास त्यांचा मुलगा अश्विन भावसार (वय 35) याच्याशी कौटुंबिक कारणावरून वाद झाला. शाब्दिक वाद इतका टोकाला गेला की काही वेळातच हाणामारी सुरू झाली. संतापाच्या भरात अश्विनने जवळच पडलेला चाकू उचलून वडील सखाराम यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस जोरदार वार केला.

दीड महिना मृत्यूशी झुंज, अखेर अंत

हल्ल्यानंतर गंभीर अवस्थेत सखाराम भावसार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या दीड महिन्यांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणाला खुनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी अश्विन भावसार याला अटक केली आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ, शरद पाटील, उपनिरीक्षक पंकज सोनवणे आणि हवालदार केशव भोये यांची टीम करत आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून इतकी भीषण हिंसक घटना घडल्याने समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...