⚡ ब्रेकिंग News

डंपरने सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडले; जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद


डंपरने सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडले; जागीच मृत्यू, संतापजनक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद

पिंपरीत प्रेमलोक पार्कजवळ भीषण अपघात; नववीतील फारुक तांबोळी यांचा जागीच मृत्यू, प्रतिबंधित वेळेत डंपरचा प्रवेश

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील प्रेमलोक पार्क परिसरात आकुर्डी-चिंचवडगाव रस्त्यावर एका भीषण अपघातात 14 वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. आरएमसी डंपरने या विद्यार्थ्याला चिरडल्याची संतापजनक घटना घडली असून, या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडी� समोर आला आहे.

फारुक शकील तांबोळी (वय 14) असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो इयत्ता नववीमध्ये शिकत होता. गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तो सायकलवरून जात असताना मागून येणाऱ्या डंपरने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेचे गांभीर्य ओळखून पिंपरी चिंचवड पोलिसांनी डंपर चालक आणि डंपर ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्रेमलोक पार्क जवळून खंडोबा माळी परिसरात चाफेकर चौकाकडे हा डंपर जात होता. मागून डंपरने फारुकच्या सायकलला धडक दिली. अपघातानंतर त्याला तातडीने वायसीएम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले."

शहरात डंपरसारख्या अवजड वाहनांना प्रवेश करण्यासाठी विशिष्ट वेळ नियोजित आहे. दुपारी 12 वाजेनंतर शहरात डंपरच्या प्रवेशास प्रतिबंध असतानाही हा अपघात साडेबारा वाजताच्या सुमारास घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, चालकावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...