आटपाडी पंचायत समितीत शिंदेसेनेचे निर्विवाद वर्चस्व; दत्तात्रय पाटील सभापती, कल्पना पुसावळे उपसभापती
भाजपने न दाखवल्याने उमेदवारी; अपक्षांच्या पाठिंब्यावर नव्हे तर स्वबळावर शिवसेनेची बिनविरोध निवड
आटपाडी : आटपाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेना (शिंदे गट) चे दत्तात्रय पाटील आणि उपसभापतीपदी कल्पना देवेंद्र पुसावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत शिंदे गटाने आठपैकी पाच जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले होते, तर भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते.
दरम्यान, विठलापूर गणाचे शिंदे गटाचे विजयी उमेदवार दिलीप हेगडे यांचे नुकतेच निधन झाल्याने समितीवरील शिवसेनेचे संख्याबळ कमी झाले. मात्र, यामुळे बहुमतावर कोणताही परिणाम झाला नसून, सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला अपक्षांची मदत घ्यावी लागली नाही. यामुळे आटपाडी पंचायत समितीत शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने दत्तात्रय पाटील यांनी सभापती पदासाठी तर कल्पना पुसावळे यांनी उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी भाजपकडून कोणतीही उमेदवारी दाखल न झाल्याने दोन्ही पदांची निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना सभापती दत्तात्रय पाटील यांनी, सर्व सदस्यांना सोबत घेऊन आटपाडी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी उपसभापती कल्पना पुसावळे तसेच शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.