⚡ ब्रेकिंग News

एकीकडे उष्णतेची लाट, तर दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; पुणे वेधशाळेचा अंदाज


एकीकडे उष्णतेची लाट, तर दुसरीकडे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; पुणे वेधशाळेचा अंदाज

राज्यात अकोल्यात 41 अंशांवर पारा; 13-14 मार्चला विदर्भ, मराठवाड्यात हलक्या सरींचा इशारा, मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

पुणे : महाराष्ट्रात सध्या एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असताना दुसरीकडे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यातील बहुतांश भागात हवामान कोरडे असून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, 13 आणि 14 मार्च रोजी विदर्भ, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ सखाराम सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यात अकोला जिल्ह्यात सर्वाधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुण्यात 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. मुंबईसह समुद्रकिनारपट्टीच्या भागातही तापमानात मोठी वाढ झाली असून, उकाडा आणि दमटपणा जाणवत आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या भागात प्रतिचक्रवर्ती परिस्थिती निर्माण झाल्यामुळे उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

क्षेत्रनिहाय हवामान अंदाज (13-14 मार्च):

विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र : विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस

मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण पट्टा : उष्ण आणि दमट वातावरण, उष्णतेची लाट येण्याची शक्यता

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर : हवामान कोरडे; तापमानात वाढ

पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून, 14 मार्चनंतर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पहाटेच्या सुमारास प्रदूषणामुळे धुक्यासारखी चादर पसरलेली दिसून येत आहे. मात्र यामुळे कोणताही धोका नसून नागरिकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...