⚡ ब्रेकिंग News

ना 50 लाख, ना कार... 'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्ना म्हणाला, "अजून काहीच मिळालेलं नाही"

ना 50 लाख, ना कार... 'बिग बॉस 19'चा विजेता गौरव खन्ना म्हणाला, "अजून काहीच मिळालेलं नाही"

तीन महिन्यांनंतरही बक्षीस रक्कम हाती न लागल्याने चाहत्यांमध्ये चर्चा; गौरव म्हणाला, "कंपनीची इंटरनल ऑडिट प्रक्रिया सुरू आहे, डिले सामान्य"

मुंबई : 'बिग बॉस 19'चा विजेता ठरल्यानंतर अभिनेता गौरव खन्नाची लोकप्रियता गगनाला भिडली असली, तरी विजेत्याला मिळणाऱ्या 50 लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम मात्र अद्याप त्याच्या हाती लागलेली नाही. डिसेंबर 2025 मध्ये पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने गौरवला विजेता घोषित केले होते. मात्र तीन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही बक्षिसाची रक्कम किंवा इतर कोणतेही पारितोषिक न मिळाल्याने चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

अलीकडील यूट्यूब व्लॉगमध्ये चाहत्यांशी संवाद साधताना गौरवने याबाबत खुलासा केला. एका चाहत्याने शो जिंकल्यानंतर मिळालेल्या रोख रक्कम, कार आणि कूपनबद्दल विचारले असता, गौरव म्हणाला, "खरं सांगायचं तर या सगळ्या गोष्टी यायला थोडा वेळ लागतो. अजूनपर्यंत काहीही मिळालेलं नाही. पण मिळेल याची मला खात्री आहे. कारण यासाठी एक प्रक्रिया असते."

तो पुढे म्हणाला, "साधारणपणे एक-दोन महिने लागतात. कंपन्यांची स्वतःची इंटरनल ऑडिट प्रक्रिया असते. त्यामुळे थोडा उशीर होतो, पण काही अडचण नाही. मी टीव्ही इंडस्ट्रीतला माणूस आहे, इथे थोडा डिले होणं सामान्य आहे."

शो जिंकल्यानंतर आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल विचारले असता, गौरवने सांगितले की कानपूरमधील त्याच्या घरी रोज सुमारे 50 ते 60 चाहते भेटायला येतात. आतापर्यंत केलेल्या इतर कोणत्याही शोपेक्षा 'बिग बॉस 19'मुळे त्याला सर्वाधिक ओळख मिळाल्याचे त्याने सांगितले. प्रेक्षकांना त्याचा शांत आणि सन्मानाने खेळलेला गेम खूप आवडल्याचेही तो म्हणाला.

गौरव खन्नाने याआधी 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' जिंकल्यानंतर 'बिग बॉस 19'ची ट्रॉफीही आपल्या नावावर केली. या शोमध्ये त्याने फरहाना भट, तान्या मित्तल, प्रणीत मोरे आणि अमाल मलिक यांना मागे टाकत विजेतेपद मिळवले. अनावश्यक भांडणं किंवा वाद न घालता शांतपणे खेळ खेळून शो जिंकणाऱ्या मोजक्या स्पर्धकांमध्ये गौरवचा समावेश झाला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...