⚡ ब्रेकिंग News

आटपाडीत सेवानिवृत्त शिक्षक संघटनेची सहविचार सभा; राज्यस्तरीय अधिवेशनाच्या तयारीला सुरुवात

 


 माणिक खंडागळे यांच्या हस्ते पावती वाटप; उर्वरित शिक्षकांनी संघटनेशी जोडून घेण्याचे आवाहन.

क्रांती न्यूज बातमी:

आटपाडी येथील दत्त मंदिरात आज (दिनांक ४ मार्च २०२६) आटपाडी तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघटनेची सहविचार सभा पार पडली. या सभेत राज्यस्तरीय होणाऱ्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात माणिक खंडागळे यांच्या हस्ते पावती वाटपाने झाली. यावेळी अशोक मोटे, अर्जुन विभुते, विजय राजमाने, शिवाजी शिरकांडे, यशोदा मोटे, रंजना सूर्यवंशी, कल्पना बनसोडे, विजया तारळेकर यांनी प्रत्येकी तीनशे रुपयांची पावती काढून अधिवेशन निधी संकलनाला सुरुवात केली.

तालुक्यातील उर्वरित सर्व सेवानिवृत्त शिक्षक बांधवांनीही संघटनेची पावती भरून या अभियानात सहभागी होऊन राज्यस्तरीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...