खासदारांच्या मुंबई बैठकीत थेट तक्रार; उद्धव ठाकरेंसमोर नाराजीचा स्फोट, प्रियंका चतुर्वेदींनी संजय राऊतांवर 'प्रोटेस्ट'
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदारांची मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षांतर्गत नाराजी आणि धुसफूस उघडपणे समोर आली. खासदारांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले.
सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीपूर्वी संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत खासदारांनी स्पष्ट सांगितले,
“उद्धव ठाकरे यांना प्रकृतीच्या काही मर्यादा आहेत, हे आम्हाला मान्य आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांनी राज्यभर फिरायला हवे, ते पुरेसा वेळ देत नाहीत.”
ही तक्रार मुख्य बैठकीतही पुनरावृत्ती झाली. खासदारांनी आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाण्याची मागणी केली.
प्रियंका चतुर्वेदींचा आक्रमक 'प्रोटेस्ट'
बैठकीत राज्यसभेच्या जागेवरून आणि संजय राऊत यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानावरून प्रियंका चतुर्वेदी प्रचंड आक्रमक झाल्या. उद्धव ठाकरे बोलत असताना त्यांनी थेट सांगितले,
संजय राऊत यांनी शरद पवारांचे नाव का घेतले?”
उद्धव ठाकरेंनी राऊत यांची बाजू सावरली. मात्र, प्रियंका चतुर्वेदींचा हा सवाल बैठकीतील चर्चेचा मुख्य विषय ठरला.
आदित्य ठाकरेंचे मौन आणि नाराजी
बैठकीत उपस्थित असूनही आदित्य ठाकरे यांनी एकाही खासदाराशी संवाद साधला नाही. त्यांच्या देहबोलीतून नाराजी स्पष्ट जाणवत होती. बैठक संपल्यानंतरही ते कोणाशी न बोलता निघून गेले, ज्यामुळे खासदारांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
बैठकीची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली. ते म्हणाले,
“माझा तुमच्यावर विश्वास आहे. भाजप-राष्ट्रवादीचे लोक सांगतात की तुमचे खासदार फुटणार आहेत, पण मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. ही सर्व लढाई मी तुमच्या भरवश्यावर लढत आहे.”
त्यांनी राज्यसभेच्या जागेसंदर्भात काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल आणि रमेश चन्नीथला यांच्याशी झालेल्या फोनवर चर्चेची माहिती दिली. काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी जागा मागितल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही राष्ट्रवादीशी बोला, आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून काय होणार?”
बैठकीत खासदारांनी उद्धव ठाकरे यांना भेटत नसल्याची, स्थानिक निवडणुका आणि प्रचारात अपुर्या मदतीचीही नाराजी व्यक्त केली.
ही बैठक ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर झाली असून, पक्षातील एकजुटीचे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.