सातारा झेडपीत राष्ट्रवादी-शिवसेनेला बहुमत असूनही भाजपचा झेंडा; दोन मंत्री अन् राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांना धोबीपछाड, महेश शिंदेंच्या पत्नी प्रिया झेडपी अध्यक्षपदी
शेवटच्या क्षणी फोडाफोडीचं राजकारण यशस्वी; पोलिसांच्या वॉचवरच्या सदस्यांना थेट गाडीतून सभागृहात नेण्याचा सिनेस्टाईल थरार; मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला लागले
सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्याच्या राजकारणात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे बहुमत असूनही शेवटच्या क्षणी फोडाफोडीचं राजकारण यशस्वी करत भाजपने अध्यक्षपदी आपला झेंडा रोवला. आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी तर राजू भोसले यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
32 जागांवर संख्याबळ दाखवत भाजपची बाजी
65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची आवश्यकता होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15 असे एकूण 35 सदस्य असूनही भाजपने 32 जागांवर संख्याबळ दाखवत ही निवडणूक जिंकली. यामुळे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि राष्ट्रवादी (शरद पवार) चे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना धोबीपछाड झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
कोणाकडे किती संख्याबळ?
| पक्ष | सदस्यसंख्या |
| भाजप | २७ |
| राष्ट्रवादी | २० |
| शिवसेना (शिंदे गट) | १५ |
| काँग्रेस | १ |
| स्वाभिमानी शेतकरी संघटना | १ |
| अपक्ष | १ |
| एकूण | ६५ |
भाजपच्या झालेल्या बैठकीला अपक्षासह 28 सदस्य उपस्थित होते. मात्र, शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीचे 2 व शिवसेनेचे 2 सदस्य फोडत भाजपची संख्या 32 वर पोहोचवण्यात आली.
फोडाफोडीचा सिनेस्टाईल थरार
बहुमताचा आकडा नसल्याने भाजपकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडण्याचा जोरदार प्रयत्न शेवटपर्यंत सुरू होता. या पार्श्वभूमीवर:
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित प्लॅन आखण्यात आला होता.
मंत्री शंभूराज देसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांच्या वॉचवर असलेल्या सदस्यांना थेट आपल्या गाडीतून सुरक्षित सभागृहात पोहोचवले.
सभागृहात घेऊन जाताना झालेल्या झटापटीमध्ये मंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला देखील लागले.
मंत्री मकरंद पाटील यांच्या गाडीतूनही काही सदस्यांना आणण्यात आले.
विरोधकांची ताकद
राष्ट्रवादी आणि शिवसेनेनेही आपली संपूर्ण ताकद लावून सर्व सदस्यांना सुखरूप सभागृहात पोहोचवले होते. कामेस कांबळे अनिल देसाई यांच्यासह काही सदस्यांना टार्गेट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणापुढे विरोधकांची ताकद अपुरी पडल्याचे दिसून आले.
प्रिया शिंदे या शिंदेसेनेचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी असून, त्यांच्या निवडीमुळे सातारा जिल्हा परिषदेत शिंदे गटाचा प्रभाव अधिक मजबूत झाला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.