⚡ ब्रेकिंग News

कोल्हापुरात पिण्याच्या पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा


 कोल्हापुरात पिण्याच्या पाण्याचा शिमगा संपत नसताना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलमुळे जीव सपशेल टांगणीला; पहाटेपासूनच अनेक पेट्रोल पंपावर रांगा

जिल्हा प्रशासनाच्या 'कागदी घोड्यांनी' काहीच अंदाज येईना; तुटवडा नसल्याच्या दाव्यांनाही गर्दीतून उडाला फटका

कोल्हापूर: पिण्याच्या पाण्याचा शिमगा संपत नसतानाच कोल्हापूरकरांना आता गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या संकटाने चांगलेच हैराण केले आहे. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. पहाटेपासूनच रांगा सुरू होत असून, अनेक पंपांवर 'पेट्रोल संपले' असे बोर्ड दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पेट्रोल पंपांवर रांगाच रांगा

कोल्हापुरातील उमा टॉकीज चौकातील पंपावर आज पहाटेपासून पेट्रोल संपल्याचा बोर्ड लागला आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर ते वाठार मार्गावरही अनेक ठिकाणी पेट्रोल मिळत नसल्याची स्थिती आहे. जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसल्याचे सातत्याने सांगण्यात येत असले, तरी पेट्रोल पंपांवरील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. यामुळे 'कागदी घोडे दाखवून परिस्थिती झटकली जात आहे का?' असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे.

गॅस सिलेंडर संकटही गडद

पेट्रोल-डिझेलच्या संकटापूर्वीच कोल्हापुरात गॅस सिलेंडरचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दोन दिवसांपूर्वीच गॅस सिलेंडर बुक करूनही ते मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता रोको केला होता. घरगुती गॅससाठी नंबर लावूनही आठवडाभर टाकी मिळत नसल्याने अनेकांची मोठी अडचण झाली आहे. व्यावसायिकांना काळाबाजार करून घरगुती गॅस दिला जात असल्याचे आरोपही होत आहेत.

प्रशासनाचे दावे आणि वास्तवातील तफावत

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पेट्रोल-डिझेल आणि गॅस सिलेंडरचा मुबलक साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, पेट्रोल पंपच बंद का आहेत, असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. दरम्यान, बीपीसीएलच्या सिंग नावाच्या अधिकाऱ्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांना दिलेला एक मेसेजही समोर आला आहे, ज्यामुळे पुरवठ्याबाबत संभ्रमाचे वातावरण आणखी वाढले आहे.

प्रशासनाकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या दाव्यांनंतरही पेट्रोल पंपांवर गर्दी कमी न होता उलट वाढतच आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक विपरित होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नसतानाच इंधन आणि गॅसच्या संकटाने कोल्हापूरकरांची चिंता द्विगुणित झाली आहे. जिल्हा प्रशासनाने आता वास्तविक परिस्थितीची गंभीर दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...