⚡ ब्रेकिंग News

अहमदाबाद विमान अपघातात मृतदेह शोधताना... सरकारी अधिकाऱ्यांनी ‘चहा-नाश्त्या’साठी मंजूर केले १६ लाखांचे बिल!

  

अहमदाबाद विमान अपघातात मृतदेह शोधताना... सरकारी अधिकाऱ्यांनी ‘चहा-नाश्त्या’साठी मंजूर केले १६ लाखांचे बिल!

मृतांच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रकार; ढिगारा हटवण्याचे काम जाणीवपूर्वक लांबवून ‘अल्पोपहार घोटाळा’; नेटकऱ्यांचा संताप, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

अहमदाबाद : १२ जून २०२५ रोजी एअर इंडिया फ्लाइट १७१ च्या भीषण अपघातानंतर मदतकार्याच्या नावाखाली एक खळबळजनक भ्रष्टाचार समोर आला आहे. मृतदेहांचा शोध घेणे आणि ढिगारा हटवण्याचे काम करणाऱ्या पथकांना केवळ चहा, नाश्ता, बिस्किटे आणि दूध पुरवण्यासाठी अहमदाबाद महानगरपालिकेच्या स्थायी समितीने १६,७४,४०५ रुपयांचे बिल मंजूर केल्याचे धक्कादायक व्हिडिओ आणि कागदपत्रे व्हायरल झाली आहेत.

 संतापजनक प्रकार काय?

 अपघातानंतर मदतकार्य जाणीवपूर्वक लांबवण्यात आले, जेणेकरून खर्च वाढवता येईल.

 अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवकांसाठी चहा-नाश्त्याच्या नावाखाली तब्बल १६ लाखांहून अधिक खर्च दाखवला.

ही पथके बी.जे. मेडिकल कॉलेजसह एकूण चार ठिकाणी काम करत होती.

संस्थांनी सादर केलेल्या बिलांना कार्योत्तर मंजुरी  देण्यात आली.

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, पीडित कुटुंबे आणि मृतदेहांचे नातेवाईक हालअपेष्टा सोसत असताना काही अधिकाऱ्यांनी आपत्तीला पैसे कमावण्याची संधी म्हणून पाहिले.

 जनतेचा संताप

सोशल मीडियावर या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली असून नेटकरी याला आपत्तीतील गिधाडे’ म्हणत आहेत. अनेकजण म्हणत आहेत:

“मृतांच्या टाळूवर लोणी खाण्याचा हा प्रकार आहे.  

अपघातस्थळीही भ्रष्टाचार? ही लूट थांबवा!”

जनता आता या ‘चहा-नाश्ता घोटाळ्या’ची उच्चस्तरीय चौकशी करण्याची आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोरात करत आहे.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...