भीषण अपघात! भरधाव कार डिव्हायडरवर आदळून उलटी पडली; प्रसिद्ध मॉडेल हर्षिल कालियाचा जागीच मृत्यू
रात्री उशिरा कामावरून घरी परतताना ‘शिप्रा पथ’वर घडला दुर्दैवी अपघात; सीसीटीव्ही फुटेज पाहून अंगावर शहारे उभे राहतात
जयपूर : राजस्थानातील जयपूरमध्ये सोमवारी रात्री उशिरा एका भीषण रस्ता अपघातात ३० वर्षीय प्रसिद्ध मॉडेल हर्षिल कालिया हिचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
‘शिप्रा पथ रोड’वर भरधाव वेगाने येत असलेली हर्षिल कालिया यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर गेली. कार प्रथम डिव्हायडरवर जोरात आदळली आणि त्यानंतर पूर्णपणे उलटली. अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ पलटी झालेली कार सरळ केली आणि गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या हर्षिलला बाहेर काढलं. तिला लगेच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिच्या डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
हर्षिल कालिया कोण होती?
राजस्थानी म्युझिक व्हिडिओमध्ये मुख्य भूमिका साकारणारी प्रसिद्ध मॉडेल
‘Crime Next Door’ या वेब सीरिजमध्येही काम केले होते
सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात वेग आणि नियंत्रण सुटणे हे मुख्य कारण असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हर्षिल कालिया यांच्या अकस्मात निधनाने मॉडेलिंग विश्वात शोककळा पसरली आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.