⚡ ब्रेकिंग News

रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीत बंड! महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी; सुनेत्रा पवारांकडे दोन रुपालींचा मोर्चा

रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादीत बंड! महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टीची मागणी; सुनेत्रा पवारांकडे दोन रुपालींचा मोर्चा 

“पक्षाच्या पुरोगामित्व चेहऱ्याला डाग लागला, तत्काळ बडतर्फ करा नाशिकच्या महिला पदाधिकाऱ्यांची तीव्र मागणी; रुपाली ठोंबरे आज सुनेत्रा पवारांची भेट घेणार

मुंबई/नाशिक : अशोक खरात प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात रुपाली चाकणकर यांच्याविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणाऱ्या रुपाली चाकणकर यांना आता पक्षातील महिला प्रदेशाध्यक्ष पदावरूनही हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

नाशिक जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे की, रुपाली चाकणकर यांना तत्काळ महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून बडतर्फ करण्यात यावे. प्रेरणा बलकवडे (नाशिक जिल्हाध्यक्ष आणि भगूर नगराध्यक्ष) यांनी म्हटले आहे की,  

“रुपाली चाकणकर यांच्यामुळे पक्षाच्या पुरोगामित्व चेहऱ्याला मोठा डाग लागला आहे.”

 रुपाली ठोंबरे सुनेत्रा पवारांना भेटणार

दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आज मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीत त्या अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या संबंधांमुळे पक्षाची होत असलेली बदनामी आणि महिलांमध्ये निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना मांडणार आहेत.

रुपाली ठोंबरे यांनी स्पष्ट केले की,  

“राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला सुरक्षित नाहीत, अशी भावना निर्माण झाली आहे. अनेक महिला कार्यकर्त्यांनी यामुळे राजीनामे दिले आहेत. पक्षात महिलांची गरज आहे, पण त्या सुरक्षित असायला हव्यात.”

 पार्श्वभूमी

रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याचे समोर आल्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता मात्र पक्षातील महिला पदाधिकारी चाकणकर यांच्या विरोधात एकत्र येत असल्याचे चित्र आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे येणाऱ्या या दोन्ही मागण्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.


Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...