⚡ ब्रेकिंग News

रस्त्यावर रील्सचा रेकॉर्ड करायचा होता, पोलिसांनीच पाडला पाठलाग! नागपूरमध्ये 20 वर्षीय स्टंटबाज तरुण अटकेत


 रस्त्यावर रील्सचा रेकॉर्ड करायचा होता, पोलिसांनीच पाडला पाठलाग! नागपूरमध्ये 20 वर्षीय स्टंटबाज तरुण अटकेत

 वाठोडा परिसरात धोकादायक स्टंट करताना आरोपी पोलिसांना दिसला; गुन्हे शाखेच्या पथकाने केला पाठलाग, पारडी वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिला

नागपूर : रस्त्यावर वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत बेदरकारपणे दुचाकी चालवणे आणि स्टंट करणे हे एका तरुणाला महागात पडले. वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुख्य रस्त्यावर धोकादायक स्टंट करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 5 चे पथक परिसरात गस्त घालत असताना एक तरुण मुख्य रस्त्यावर वेगाने मोटारसायकल चालवत स्टंट करताना दिसला. त्याच्या या बेफिकीर वाहन चालविण्यामुळे इतर नागरिकांचे जीव धोक्यात आले होते. हे गांभीर्य ओळखून पोलिस पथकाने तात्काळ त्याचा पाठलाग सुरू केला.

काही अंतराच्या पाठलागानंतर स्वामीनारायण मंदिर परिसरात नाकाबंदी करत पोलिसांनी त्या तरुणाला ताब्यात घेतले. हा तरुण म्हणजे सूरज सिंग विक्रम सिंग (वय 20) असून तो जरीपटका येथील लाल गोदाम परिसरात राहतो. आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पारडी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिसांचे आवाहन 
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर स्टंट करणे किंवा बेदरकारपणे वाहन चालवणे हा गुन्हा असून, अशा प्रकारे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यापुढेही अशा प्रकारच्या घटनांमध्ये सहभागी होणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...