⚡ ब्रेकिंग News

बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश! 17 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक

 

 बीडमध्ये दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश! 17 दुचाकींसह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन आरोपींना अटक

 गेवराईतून चोरीच्या दुचाकींचा तपास करताना नेकनूरमधील गोडाऊनवर छापा; स्पेअर पार्ट बदलून मॉडीफाय करून विक्री करत होते आरोपी

 बीड  जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या मोठ्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. जिल्ह्यातील गेवराई परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास करताना पोलिसांनी नेकनूर परिसरातील एका गोडाऊनवर छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईत 17 दुचाकींसह 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कशी केली कारवाई?

बीड जिल्ह्यातील गेवराई परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकींचा तपास करताना पोलिसांना नेकनूर परिसरातील एका गोडाऊनची माहिती मिळाली. या ठिकाणी चोरीच्या दुचाकींचे स्पेअर पार्ट बदलून मॉडीफाय करून बाजारात विक्री केल्या जात होत्या. पोलिसांनी या गोडाऊनवर धाड टाकून ही कारवाई केली.

किती मुद्देमाल जप्त?

या कारवाईत दोन आयशर टेम्पो भरून 17 दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या सर्वात मोठ्या कारवाईंपैकी ही एक कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दिली आहे.

इतर बातम्या: नाशिकमध्ये अफइवांनी खळबळ

दरम्यान, नाशिकमध्ये मुलं चोरणाऱ्या टोळीच्या अफवांनी खळबळ उडाली होती. होळी धुलीवंदन सणासाठी लागणाऱ्या गोवऱ्या विक्रीसाठी आलेल्या चार महिलांना नागरिकांनी मुलं चोरणारी टोळी समजून पकडले होते. अंबड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन या महिलांची विचारपूस केली. या महिला व्यावसायिक असून त्या दरवर्षी होळी सणानिमित्त गोवऱ्या-लाकडं विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...