⚡ ब्रेकिंग News

"10 मुलं घेऊन येऊ, बलात्कार करू..."; ज्याला भाऊ मानलं त्याच्या चाहत्यांकडून दिव्या अग्रवालला अत्याचाराच्या धमक्या

"10 मुलं घेऊन येऊ, बलात्कार करू..."; ज्याला भाऊ मानलं त्याच्या चाहत्यांकडून दिव्या अग्रवालला अत्याचाराच्या धमक्या

'द 50' मधील वादानंतर प्रिन्स नरुलाच्या फॅन्सकडून आक्षेपार्ह मेसेज; अभिनेत्रीनं शेअर केले स्क्रिनशॉट, म्हणाली- "हे तथाकथित सेलिब्रिटी चाहत्यांना चिथावणी देतात"

मुंबई: 'बिग बॉस OTT'ची विजेती आणि अभिनेत्री दिव्या अग्रवाल हिच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 'द 50' या रिअॅलिटी शोमधून बाहेर पडल्यानंतर तिने मानलेला भाऊ प्रिन्स नरुला याच्याशी झालेला वाद चव्हाट्यावर आला असून, आता प्रिन्सच्या चाहत्यांकडून दिव्याला बलात्कारासह अत्याचाराच्या धमक्या मिळत असल्याचं समोर आलं आहे.

सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत असलेल्या दिव्याने इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून या धमक्यांबाबत मोठा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, "गेल्या काही काळापासून माझ्या 'एक्स-भावा'च्या चाहत्यांकडून प्रचंड द्वेष आणि टीका सहन करावी लागतेय. ट्रोलिंगबद्दल मला कोणतीही हरकत नाही, पण हे संदेश आता अत्यंत आक्षेपार्ह पातळीपर्यंत पोहोचले आहेत."

काय म्हणाली दिव्या? 

दिव्याने धक्कादायक माहिती देताना सांगितले, "बलात्काराच्या धमक्या? 'तू कुठे राहतेस हे आम्हाला माहीत आहे; आम्ही दहा जणांना घेऊन तिथे येऊ. आम्ही तुझ्यावर बलात्कार करू, त्याचे व्हिडीओ काढू - तू या सगळ्यालाच पात्र आहेस...' अशा प्रकारच्या कमेंट्स मला येत आहेत. काही लोकांनी तर माझा पत्ता माहीत असल्याचा दावा केलाय."

दिव्याने प्रिन्स नरुलावरही गंभीर आरोप केला आहे. ती म्हणाली, "हे तथाकथित सेलिब्रिटी स्वतःच्या प्रेमात इतके बुडालेले असतात की ते शोचे एपिसोड्स पाहतात आणि मग इतरांना सांगत फिरतात. आणि मग ते आपल्या चाहत्यांना चिथावणी देतात, जेणेकरून ते मला असे घाणेरडे मेसेज पाठवतील. आधी लोकांना मदत करायची, त्यांना आपल्या घरात आश्रय द्यायचा; आणि मग त्यावर दावा करत फिरायचं की 'मीच मोठं केलंय'."

नेमकं प्रकरण काय? 

प्रिन्स नरुलाने 'द 50' मधून बाहेर पडल्यानंतर एक व्हिडीओ अपलोड केला होता, ज्यामध्ये त्याने दिव्यावर आरोप केला की तिने हा खेळ व्यवस्थितपणे खेळला नाही, केवळ एकच टास्क पूर्ण केला. तसेच, पाच एपिसोड्स पाहिल्यानंतर दिव्या पुन्हा शोमध्ये परतली आणि तिला स्वतःचंच वर्चस्व वाटू लागल्याचं त्याने म्हटलं होतं. प्रिन्सने हेही नमूद केलं की, दिव्या एकेकाळी त्याला आपला भाऊ मानत असे आणि खेळादरम्यान त्यानेच तिला संकटातून वाचवलं होतं, असं असूनही तिने प्रतिस्पर्धी ग्रुपशी हातमिळवणी केली.

या व्हिडीओनंतर प्रिन्सच्या चाहत्यांकडून दिव्याला धमक्यांचा भडिमार सुरू झाला आहे. दिव्याने हे स्क्रिनशॉट्स शेअर करत याबाबत कारवाईची मागणी केली असून, सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...