⚡ ब्रेकिंग News

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा भडका! LPG सिलेंडर ६२ रुपयांनी महागला; दिल्लीपासून मुंबईपर्यंत नवे दर लागू, तुमच्या शहरांतले दर काय?


   १९ किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या दरात ६२.५० रुपयांची वाढ; दिल्लीत २,८१० रुपये; घरगुती सिलेंडरचे दर स्थिर; हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅटरिंग व्यवसायांना फटका; नवरात्रौत्सवाच्या तोंडावर बजेट कोलमडणार

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

नवी दिल्ली / मुंबई - नवा महिना सुरू झाला आणि सर्वसामान्यांना पहिल्याच दिवशी मोठा झटका बसला. ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवसाच्या सकाळीच महागाईची (Inflation) फोडणी बसली आहे.

ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी १ ऑक्टोबर २०२६ च्या सकाळी एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये (LPG Cylinder Price) बदल केले असून नव्या किंमती जारी केल्या आहेत.

नवरात्रौत्सवाच्या काही दिवसांवरच आला असताना हा महागाईचा झटका अनेकांचं बजेट कोलमडवणारा ठरतोय. दरम्यान, तेल कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या (LPG Cylinder) किंमतींमध्ये वाढ केली असून तब्बल ६२.५० रुपयांनी दर वाढवले आहेत.

तर, घरगुती सिलेंडर्सच्या किंमती मात्र स्थिर ठेवण्यात आल्या आहेत.

१ ऑक्टोबर २०२६ पासून ऑइल मार्केटिंग कंपन्यांद्वारे वाढवण्यात आलेल्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किंमतींवर नजर टाकली, तर राजधानी दिल्लीमध्ये (Delhi LPG Cylinder Price) १९ किलोचा सिलेंडरचे दर ६२.५० रुपयांनी वाढून आता २ हजार ८१० रुपयांवर पोहोचले आहेत.

दरम्यान, याआधी गेल्या सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला १९ किलो LPG Cylinder Price मध्ये वाढ करण्यात आलेली आणि दिल्लीमध्ये सिलेंडर ९.५० रुपयांनी महाग झालेला.

आता सणासुदीच्या काळात एलपीजी सिलेंडरच्या महागाईचा झटका अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे.

एलपीजी सिलेंडरच्या महागाईचा झटका थेट हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि कॅटरिंग व्यवसायांना बसला आहे.

एकीकडे तेल कंपन्यांनी १९ किलोच्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडर्सच्या किमतींमध्ये वाढ केली आहे.

यादरम्यान, काहीशी दिलासादायक बाब म्हणजे, घरगुती एलपीजी सिलेंडर्सच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

म्हणजेच, १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर जुन्याच दरांमध्ये मिळतोय.

| शहर | दर |

| दिल्ली | ९४२ रुपये |

| मुंबई | ९४१.५० रुपये |

| कोलकाता | ९६८ रुपये |

| चेन्नई | ९५७.५० रुपये |

कमर्शियल गॅस सिलेंडर्सचे दर यापूर्वी सप्टेंबर महिन्यात वाढवण्यात आलेले.

या दरम्यान, ९.५० रुपयांची वाढ करण्यात आलेली. ज्यामध्ये किमती वाढून २,७४७.५० रुपयांपर्यंत पोहोचली.

आता आज १ ऑक्टोबर ६२.५० रुपयांची वाढ झालीय. यानंतर या किंमतींत २,८१० रुपयांची वाढ झालीय.

दरम्यान, तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी (LPG) सिलेंडरच्या किमतींची पुनर्रचना करतात आणि सकाळी नवे दर जाहीर करतात.

अलीकडच्या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वारंवार चढ-उतार झालेत, ज्यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समधील खाद्यपदार्थांचे दर वाढू शकतात.

दुसरीकडे, घरगुती सिलेंडरच्या किमती मात्र स्थिर आहेत.

| मुद्दा | तपशील |

| वाढ | १९ किलो कमर्शियल सिलेंडर |

| रक्कम | ६२.५० रुपये |

| दिल्ली | २,८१० रुपये |

| घरगुती | स्थिर |

| १४.२ किलो दिल्ली | ९४२ रुपये |

| १४.२ किलो मुंबई | ९४१.५० रुपये |

| सप्टेंबर वाढ | ९.५० रुपये |

| परिणाम | हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, कॅटरिंग |

| नवरात्र | तोंडावर |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...