क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
छत्रपती संभाजीनगर : राज्यसरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून सध्या दुष्काळी पंचनामे सुरू असून कुठल्याही शेतकऱ्याची शेतमजुराची अडवणूक होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश महसूल मंत्री व दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशेषतः राष्ट्रीयकृत बँकेपासून डीसीसी बँक, पतसंस्था, प्रायव्हेट बँका कुठल्याच बँकेने शेतकऱ्याच्या मागे तगादा लावायचा नाही. या काळात सावकारांनी जर शेतकऱ्याला लुटलं तर सरकार त्याला सोडणार नाही असा इशाराच बावनकुळे यांनी दिला. दुष्काळी पंचनामे आणि सरसकट मदतीवरही ते बोलले आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते बोलत होते. या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, सरकारच्या भूमिकेवर राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अचूक पंचनामे व्हावेत, कारण दुष्काळ तर जाहीर झाला आहे. २६५ तालुके आणि आज-उद्या काही तालुके जोडणार आहोत. पण सर्वांनी अचूक पंचनामे करण्याकरिता पुढाकार घ्यावा, कुठेही चूक होऊ नये, अशा सूचना मुख्यमंत्री महोदयांनी सर्वच मंत्र्यांना दिल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. तसेच, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांमध्ये या ठिकाणी पंचनाम्यावर काम होणार आहे आणि लवकरच आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग आणि महसूल विभाग या तिन्ही विभागांमध्ये या ठिकाणी पंचनाम्यावर काम होणार आहे आणि लवकरच आपल्याला शेतकऱ्याला मदत करायची आहे, याकरिता आमचं सरकार काम करणार आहे. शेतकऱ्याच्या या दुष्काळी परिस्थितीमध्ये सोबतच पिण्याच्या पाण्याचं नियोजन महत्त्वाचं आहे, जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन महत्त्वाचं आहे, पुढच्या काळामध्ये जलसंधारण... या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे जे काही आपल्याकडे साठे आहेत त्याला पुन्हा एकदा मजबूत करायचं आहे. आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शेतकरी-शेतमजूर त्याला कुठल्याही पद्धतीची अडवणूक होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, असेही बावनकुळे म्हणाले.
बँका कुठल्याही पद्धतीने, बँकांचं जे काही वागणं आहे, ते वागणं योग्य नाही असं मला आता कळालेलं आहे. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सर्व बँकांना सांगणार आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, कुठल्याही बँकेने पतसंस्थेपासून ते डीसीसी बँक, राष्ट्रीयकृत बँकेपासून ते प्रायव्हेट बँका कोणीही शेतकऱ्याच्या मागे तगादा लावायचा नाही. सावकारांनी शेतकऱ्यांना लुटायचं नाही. सावकारांनी जर शेतकऱ्यांना लुटलं तर सरकार सोडणार नाही, असा इशारा मंत्री बावनकुळे यांनी दिला. या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, बँकांनी शेतकऱ्यांवर दबाव आणू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
या दुष्काळाला सर्वच पक्षांनी - विरोधी पक्ष, सत्ताधारी पक्षांनी एकत्र येऊन टीका-टिप्पणी न करता सर्वांची जबाबदारी शेतकरी-शेतमजूरला मदत करायची आहे. १८ पगड जाती, १२ बलुतेदार हा असलेला शेतकरी, या शेतकऱ्याला आम्ही... प्रचंड दुष्काळामध्ये अडकलेला शेतकरी बाहेर काढण्याकरिता आम्ही काम करतोय. तसेच, विरोधी पक्षाची जबाबदारी आहे दुष्काळामध्ये जनतेला साथ देणे, कारण विरोधी पक्ष काही मतं घेत नाही का? निवडणूक जिंकला-हारला सोडा, पण त्यांनी निवडणुकीत मतं घेतली आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला दुष्काळामध्ये आपल्याला जनतेमध्ये जावंच लागतं, जनतेमध्ये फिरावं लागतं, कारण केवळ देखाव्याकरता नाहीये. काही लोक देखाव्याकरता फिरतात हे वेगळं आहे, पण समाजाच्या गरीब माणसाला, शेतकरी कष्टकऱ्यांना मदत करणे आणि ती जबाबदारी सर्वच पक्ष-विपक्षाने स्वीकारली पाहिजे. त्यांचं स्वागतच आहे ते फिरतायत. पण आमची जास्त जबाबदारी आहे सरकार म्हणून, आणि सरकार म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना मदत करायची आहे.
पंचनामा एवढ्याकरता असतं की NDRF जे असतं, केंद्र सरकारचे जे निकष आहेत, त्याची मदत नंतर येते राज्याला, पण निकष द्यावे लागतात. जर निकषात आपण बसलो नाही, तर केंद्राची येणारी जी मदत आहे, त्याचा पूर्ण बोजा राज्याला पडतो. राज्य तर पूर्ण मदत करणार आहे. आज राज्य केंद्राची वाट बघणार नाही. पण ट्रिगर १ मध्ये येणे, ट्रिगर २ मध्ये येणे हे बसवावं लागतं, तर केंद्र सरकारची जी त्या ठिकाणी टीम येते, त्यालाही संपूर्ण रेकॉर्ड द्यावा लागतो, त्याचे त्या ठिकाणी ड्रोन सर्व्हे द्यावे लागतात, पंचनाम्याचे रिपोर्ट द्यावे लागतात, तेव्हा केंद्राची मदत येते. आणि केंद्राची मदत मिळणं हे राज्याकरिता महत्त्वाचं असतं, म्हणून पंचनामे करावे लागतात.
ते पुढे म्हणाले, पंचनामे अचूक व्हावे. कुठल्याही पद्धतीने... कधी कधी काय वर हिरवं दिसतं, खाली काही नाही आहे. म्हणजे कापसूच परवा बघितला वर हिरवा आहे, कारण तेव्हा पाऊस पडल्यामुळे किंवा जमिनीतलं आपल्या शेतातलं पाणी दिल्यामुळे तो हिरवा आहे. पण खाली बोंडच नाहीये कापसाला. त्यामुळे मला असं वाटतं हा घोळ होऊ नये. हा घोळ आपल्या शेतकऱ्याला त्याठिकाणी अडचणीत आणणारा आहे आणि म्हणून पंचनामे अचूक व्हावे.
सध्या शरद पवार दुष्काळ दौऱ्यावर आहेत. यावरूनही मंत्री बावनकुळे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, विरोधी पक्षाची जबाबदारी आहे दुष्काळामध्ये जनतेला साथ देणे, कारण विरोधी पक्ष काही मतं घेत नाही का? निवडणूक जिंकला-हारला सोडा, पण त्यांनी निवडणुकीत मतं घेतली आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला दुष्काळामध्ये आपल्याला जनतेमध्ये जावंच लागतं, जनतेमध्ये फिरावं लागतं, कारण केवळ देखाव्याकरता नाहीये. काही लोक देखाव्याकरता फिरतात हे वेगळं आहे, पण समाजाच्या गरीब माणसाला, शेतकरी कष्टकऱ्यांना मदत करणे आणि ती जबाबदारी सर्वच पक्ष-विपक्षाने स्वीकारली पाहिजे. त्यांचं स्वागतच आहे ते फिरतायत. पण आमची जास्त जबाबदारी आहे सरकार म्हणून, आणि सरकार म्हणून आम्हाला शेतकऱ्यांना मदत करायची आहे.
पुण्यातील मुंडवा येथील ४० एकर सरकारी जमीन बाजार मूल्यापेक्षा कमी दरात खरेदी केल्याच्या प्रकरणात पार्थ पवार यांना आरोपी का केलं नाही अशी विचारणा उच्च न्यायालयाने केल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, उच्च न्यायालयामध्ये आमच्या विभागानं, महसूल आणि पोलीस विभागानं संपूर्णपणे तपासाचा रिपोर्ट मांडला आहे. महसूल खात्याने पूर्ण तपासणी केली आहे. मी आधीच वारंवार स्पष्ट केलं आहे की आमच्या महसुली कायद्याप्रमाणे एखादी जमीन घेणारा आणि विकणारा हा जो आमच्या अधिकाऱ्यासमोर येतो, तो आमच्या दृष्टीने गुन्हेगार आहे, त्याच्यावर एफआयआर केला पाहिजे; एवढाच महसुली कायदा म्हणतो. आणि म्हणून आमच्या महसुली कायद्याप्रमाणे आम्ही दोन जे एफआयआर केले, आमच्या दालनात आलेला, आमच्या अधिकाऱ्याकडे आलेला तो देणारा आणि लिहून घेणारा. आणि ठप्पा मारणारा आमचा अधिकारी चुकीचा ठप्पा मारला म्हणून, या तिघांना आरोपी आम्ही केलाय.
मुंबईतील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुंबईला जे आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे, त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की आंदोलन हे राजकीय स्वरूपाचं होऊ नये. राजकीय स्वरूपाच्या आंदोलनातून या ठिकाणी कारण नसताना या राज्याच्या जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये. ज्या कारणाकरिता आंदोलन आहे त्या कारणाचं स्पष्टीकरण यापूर्वी झालेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं असे आंदोलन करून या ठिकाणी मुंबईसारख्या राजधानीच्या असलेल्या शहराला कोणीही या ठिकाणी वेठीस धरू नये, एवढंच माझं यासंबंधी म्हणणं आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणारी अनेक महत्त्वाची वक्तव्ये केली आहेत. बँकांनी शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावू नये, सावकारांनी शेतकऱ्यांना लुटू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, दुष्काळी पंचनामे अचूक व्हावेत आणि राज्य केंद्राची वाट न बघता मदत करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सरसकट मदतीवरही त्यांनी भूमिका मांडली आहे. या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, सरकारच्या भूमिकेवर राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.