क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
ठाणे - ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायर करत गोळीबार करण्यात आला.
गोळीबार झाल्यानंतर पूर्णेकर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळीबार झाला.
गोळीबारामुळे पूर्णेकर जखमी झाल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, उपचारादरम्यान प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू झाला.
पूर्णेकर यांना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर मॉलजवळील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रदीप पूर्णेकर यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्यावर मानपाडा या ठिकाणच्या त्यांच्या गणेश नगर येथील कार्यालयामध्ये हा प्राणघातक हल्ला झाला, अशी माहिती आहे.
तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हल्ला नेमका कोणी केला? हल्ल्यामागील कारण काय? आणि मारेकरी नेमके कोण होते? याचा छडा लावण्याचे काम आता पोलिसांवर आले आहे.
काही दिवसांपूर्वीच एका पोलीस उपनिरीक्षकाची हत्या ठाणे शहरात झाली होती. त्यात आता दुसरी हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठाण्यात काहीच दिवसांच्या अंतराने हत्येची दुसरी घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
| मुद्दा | तपशील |
| मृत | प्रदीप (बाळा) पूर्णेकर |
| पद | शिवसेना (UBT) ठाणे विभागप्रमुख |
| घटना | दोन राऊंड गोळीबार |
| स्थळ | गणेश नगर, मानपाडा, ठाणे |
| रुग्णालय | इन्फिनिटी हॉस्पिटल, आर मॉलजवळ |
| आरोपी | ३-४ अज्ञात व्यक्ती |
| तपास | कापूरबावडी पोलीस |
| पार्श्वभूमी | काही दिवसांपूर्वी पोलीस उपनिरीक्षकाची हत्या |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.