⚡ ब्रेकिंग News

मोठी बातमी! दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून नवा नियम लागू; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय


   'आधार नाही तर दस्त नोंदणी नाही'; ६३ प्रकारच्या नोंदींसाठी आधार सक्ती; खोटे साक्षीदार, खोटे पक्षकार उभे करून होणारी फसवणूक हद्दपार; मालमत्ता खरेदी-विक्रीत पारदर्शकता; राजपत्र प्रकाशित

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याच्या महसूल विभागात गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाची भर पडली आहे.

दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. जर दस्त करणाऱ्या पक्षकारांकडे आधार कार्ड नसेल तर त्यांच्या दस्ताची नोंदणी होणार नाही.

विविध दस्तांची नोंदणी होत असताना खोटे साक्षीदार आणि खोटे पक्षकार उभे करुन केली जाणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीनं या निर्णयासंदर्भातील राजपत्र प्रकाशित करण्यात आले आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दस्त नोंदणीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

आधार नाही तर कोणतीच दस्त नोंदणी होणार नाही. दस्त नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

मालमत्ता खरेदी-विक्रीतील फसवणूक टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.

दस्त नोंदणी, जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणांमध्ये खोटे साक्षीदार, खोटे पक्षकार उभे करून होणारी फसवणूक आता हद्दपार होणार आहे.

राज्य सरकारनं दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड बंधनकारक केले आहे.

यामुळे खरेदी, विक्री, बक्षीस, गहाण, वाटणीसह ६३ प्रकारच्या नोंदीसाठी आधार ओळखपत्र सक्तीचे असेल.

दस्त नोंदणीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आल्याचा निर्णय १ ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाचे राजपत्र जारी झाले आहे.

आता दस्त नोंदणी करताना आधार कार्ड बंधनकारक करण्यात आल्याने खोटे साक्षीदार आणि खोटे पक्षकार उभे करता येणार नाहीत.

यामुळे दस्त नोंदणीतील फसवणुकीचे प्रकार आता हद्दपार होतील.

यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया आणखी पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.

| मुद्दा | तपशील |

| निर्णय | दस्त नोंदणीसाठी आधार अनिवार्य |

| लागू | १ ऑक्टोबरपासून |

| आधार नाही तर | नोंदणी होणार नाही |

| नोंदी | ६३ प्रकार |

| कारण | खोटे साक्षीदार, पक्षकार; फसवणूक टाळणे |

| सूचना | मुख्यमंत्री फडणवीस |

| निर्णय | महसूलमंत्री बावनकुळे |

| राजपत्र | प्रकाशित |

| परिणाम | पारदर्शकता |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...