⚡ ब्रेकिंग News

धक्कादायक! स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरू; महिलांसह पुरुषांना ताब्यात, एकाच वेळी सात ठिकाणी कारवाई; बीड शहरात खळबळ


  पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानंतर अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाची धडक कारवाई; ताब्यात घेतलेल्यांना बीड जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले; शहर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

बीड - बीड शहरातील विविध भागांतील सात स्पा सेंटरवर (spa centers) पोलिसांनी (Police) बुधवारी धडक कारवाई केली आहे. यामध्ये अनेक महिला तसेच पुरुष ग्राहकांना ताब्यात घेतले आहे.

स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.

बीड शहर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशानंतर अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने संबंधित स्पा सेंटरवर छापे टाकले.

या कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या महिला आणि पुरुष ग्राहकांना वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

वैद्यकीय तपासणीचा अहवाल तसेच पोलिसांच्या पुढील तपासानंतर संबंधित स्पा सेंटरमध्ये नेमके कोणते प्रकार सुरू होते, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, एकाच वेळी सात स्पा सेंटरवर झालेल्या या कारवाईमुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, कारवाईतील व्यक्तींविरोधात कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

अलिकडच्या काळात स्पा सेंटरच्या नावाखाली आक्षेपार्ह प्रकार सुरू असल्याच्या घटना वाढत असल्याचे चित्र पाहायलामिळत आहे. अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत.

अनेक भागांत स्पा सेंटरच्या नावाखाली देहव्यापाराचा प्रकार देखील होत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये अशीच घटना घडली होती. नांदेडच्या फुले मार्केट परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापाराच्या रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकला होता.

या कारवाईत परराज्य आणि नेपाळमधील सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली होती.

पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली होती. स्पा मालक फरार झाला होता.

या कारवाईत जवळपास दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.

या कारवाईमुळे मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला अनैतिक धंदा चर्चेत आला होता.

अशा घटना घडत असल्यामुळे पोलीस प्रशासन देखील सतर्क झाले आहे. माहिती मिळताच अशा ठिकाणी कारवाई केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

बीडमध्ये देखील अशीच घटना घडत असल्याचे समोर आले आहे. आज पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे बीड शहरात खळबळ उडाली आहे.

| मुद्दा | तपशील |

| कारवाई | ७ स्पा सेंटरवर छापे |

| स्थळ | बीड शहर, शिवाजीनगर |

| ताब्यात | महिला आणि पुरुष ग्राहक |

| आदेश | पोलीस अधीक्षक नवनीत काँवत |

| पथक | अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख |

| वैद्यकीय | बीड जिल्हा रुग्णालय |

| पूर्वीची घटना | नांदेड, फुले मार्केट |

| सुटका | ७ पीडित महिला |

| अटक | ३ आरोपी |

| खळबळ | बीड शहरात |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...