⚡ ब्रेकिंग News

गळवेवाडीत जुन्या वादातून हल्ला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल


लोखंडी सळई, काठी व दगडाने मारहाण; एक जखमी

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

आटपाडी, दि. २ ऑक्टोबर : तालुक्यातील गळवेवाडी येथे जुन्या वादातून एका शेतकऱ्यावर लोखंडी सळई, काठी आणि दगडाने हल्ला केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ भिवा गळवे (वय ३३, रा. गळवेवाडी, ता. आटपाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार कल्लेश्वर नामदेव गळवे, उद्धव दादा गळवे, सुजल उद्धव गळवे, धनाजी किसन गळवे व गिरजाप्पा नाथा गळवे (सर्व रा. गळवेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गळवेवाडी येथील जुन्या मराठी शाळेसमोर घडली. फिर्यादी किराणा साहित्य खरेदीसाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून "तू आमच्या आईला शिवीगाळ का केलीस?" असा जाब विचारला. त्यानंतर आरोपींनी लोखंडी सळई, काठी आणि दगडाने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.

या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. तसेच पाठीवर व डाव्या हातावरही मार लागल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप आहे.

जखमी फिर्यादी उपचार घेत असल्याने तक्रार देण्यास विलंब झाला असून, उपचारानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६२/२०२६ अन्वये संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...