⚡ ब्रेकिंग News

'शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेलमध्ये नाव, माणुसकी म्हणून ते आपल्यासोबत येतील वाटत होतं'; पुरुषोत्तम जगतापांबाबत काय म्हणाले जय पवार?


 'दादांनी ज्या व्यक्तीवर एवढा विश्वास टाकला, हे असं कसं वागू शकतात'; 'सोमेश्वर निवडणूक बिनविरोध झाली असती तर ती स्वर्गीय अजित दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरली असती'; 'दादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही'; 'सुनेत्रा वहिनींनी सर्व दुःख बाजूला ठेवून तुमची जबाबदारी स्वीकारली'; 'मी दादांसारखेच काम करणार' — जय पवारांची भावनिक प्रतिक्रिया

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनल उभे केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी पुरुषोत्तम जगतापांबाबत भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. पुरुषोत्तम जगताप दादांचे जुने सहकारी होते. आम्ही मनात काहीही ठेवले नाही, शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे नाव पॅनलमधील यादीत होते. असे जय पवार म्हणाले. 'दादांनी ज्या व्यक्तीवर एवढा विश्वास टाकला, हे असं कसं वागू शकतात' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आज अजितदादा असते तर तुम्हाला पाहून त्यांना खूप आनंद झाला असता. गावोगावी जाताना दादांच्या आठवणी जागवल्या गेल्या त्यामुळे मन भरुन आल्याचे मत जय पवार यांनी व्यक्त केले. आज विजय शिवतारे आपल्याला भाऊ म्हणून साथ देत आहेत. ते म्हणाले की माझी आणि दादांची दुश्मनी तुम्ही पाहिली, पण दोस्ती नाही पाहिली असे जय पवार म्हणाले. पुरुषोत्तम जगताप दादांचे जुने सहकारी होते. आम्ही मनात काहीही ठेवले नाही, शेवटच्या क्षणापर्यंत त्याचे नाव पॅनलमधील यादीत होते. दादांची आठवण म्हणून माणुसकी म्हणून ते आपल्यासोबत येतील वाटत होतं असे जय पवार म्हणाले.

सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली असती तर ती स्वर्गीय अजित दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरली असती असे जय पवार म्हणाले. दादांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही. आज वाईट वाटतं की दादांनी ज्या व्यक्तीवर एवढा विश्वास टाकला हे असं कसं वागू शकतात असे जय पवार म्हणाले. आज सर्वजण स्वागत करायला उभे राहिले हा कारखाना तुमचा आहे.

सुनेत्रा वहिनींनी सर्व दुःख बाजूला ठेवले आणि तुमची जबाबदारी स्वीकारली. जेव्हा दादांचा अपघात झाला तेव्हा सर्व कागदपत्रे विखुरली होती. मी दादांना विचारायचो की किती काम कराल, तेव्हा दादा म्हणायचे जय अगोदर संपूर्ण बारामती आपलं कुटुंब आहे असं ते म्हणायचे. दादा गेल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दादांचे बॅनर लागले सर्वांनी दुःख व्यक्त केले, पत्रकार देखील रडल्याचे जय पवार म्हणाले. राज्यातील सर्वांसाठी बारामतीकारांसाठी दादा काम करत होते, तसेच मी काम करणार असल्याचे जय पवार म्हणाले. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असंही ते म्हणाले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. निवडणुकीत अजित पवार गटापासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनल उभे करणाऱ्या पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसपासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनल निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला असून, या घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने देखील स्वतंत्र पॅनल उभा केले आहे.

यापूर्वी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या फोटो आणि नावाच्या वापरावरून वाद सुरू झाला होता. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अजितदादांचा फोटो आणि नाव वापरण्यावर बंदी घातली होती. पॅनेल प्रमुख पुरुषोत्तम जगताप यांनी या बंदीला आव्हान दिले होते.

या प्रकरणामुळे बारामती परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला जय पवार यांनी पुरुषोत्तम जगतापांबाबत भावनिक प्रतिक्रिया दिली असता, दुसऱ्या बाजूला जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. या प्रकरणामुळे आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभे केल्यानंतर जय पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. 'शेवटच्या क्षणापर्यंत पॅनेलमध्ये नाव होते, माणुसकी म्हणून ते आपल्यासोबत येतील वाटत होतं' असे ते म्हणाले. 'दादांनी ज्या व्यक्तीवर एवढा विश्वास टाकला, हे असं कसं वागू शकतात' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 'सोमेश्वर निवडणूक बिनविरोध झाली असती तर ती स्वर्गीय अजित दादांसाठी खरी श्रद्धांजली ठरली असती' असेही ते म्हणाले. 'मी दादांसारखेच काम करणार' असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणामुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...