⚡ ब्रेकिंग News

'खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा'; रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान


 एमपीएससी आंदोलनाप्रकरणी पुणे पोलिसांनी १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर रोहित पवारांची आक्रमक पोस्ट; 'पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार?'; 'FIR मध्ये इतक्या चुका? FIR करणारा अधिकारी पेपर फोडून आला की काय?'; 'हे विद्यार्थ्यांवरील सरकारचे दबावतंत्र, पण विद्यार्थी घाबरणार नाहीत'; 'वकिलांची मोठी फौज उभी केली आहे'; 'भ्रष्ट भीमनवारला पदावरून हाकलावे'; मुख्यमंत्र्यांचं 'राज्य सरकारला हटवण्याचा अधिकार नाही'चं स्पष्टीकरण

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटीच्या मुद्यावरुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. रोहित पवार यांच्या नेतृत्त्वात पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाप्रकरणी पुणे पोलिसांनी १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणारी पोस्ट रोहित पवार यांनी खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, असं आव्हान पुणे पोलिसांना दिलं आहे.

पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? विद्यार्थ्यांच्या सत्याग्रहाला १ ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. त्या दिवशी इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ पेपरफुटी समोर आणणारा ऋषिकेश गांगुर्डे याच्यासह ओमकार पाटील, गजानन शेळके, सोमनाथ चव्हाण आणि संकेत कणसे उपस्थित नसताना, ते गावी असतानादेखील त्या दिवशी इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ पोलिसांना कसे दिसले?

विद्यार्थ्यांचे वर्णन करताना प्रमोद पाटील यांचे लिंग महिला दाखवले आहे, तर प्रियांका चौधरी यांचे लिंग पुरुष दाखवले आहे. FIR मध्ये इतक्या चुका? हे सर्व पाहता, FIR करणारा अधिकारी पेपर फोडून आला की काय, असा प्रश्न पडतो. असो, वरून मालकाचे आदेश ऐकून पोलीस वागायला लागले की असेच होते. हे विद्यार्थ्यांवरील सरकारचे दबावतंत्र आहे. पण या दबावाला विद्यार्थी घाबरणार नाहीत. हे सर्व गुन्हे जामीनपात्र असून, वकिलांची मोठी फौज आम्ही उभी केली आहे. त्यामुळे सरकारने असे खोटे गुन्हे दाखल करण्यापेक्षा भ्रष्ट भीमनवारला पदावरून हाकलावे. तो सरकारचा जावई आहे का? खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा!

रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत पुणे पोलीस आयुक्तांना सवाल विचारले आहेत, त्याचं पुणे पोलीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पोस्टमुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पदावरुन हटवण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारनं न्यायालयीन चौकशीची तयारी दाखवली आहे. चौकशीत ते दोषी आढळल्यास त्यांना पदावरुन हटवण्याची शिफारस राष्ट्रपतींना करु असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पुण्यात सुरुवातीला विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु होतं आता तिथं राजकीय आंदोलन सुरु असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीमुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, या मुख्य मागणीसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.

या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला रोहित पवार यांनी पोलिसांना आव्हान दिले असता, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एमपीएससी आंदोलनाप्रकरणी पुणे पोलिसांनी १५ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर रोहित पवार यांनी पुणे पोलिसांना आव्हान दिले आहे. 'खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा' असे ते म्हणाले. FIR मधील चुकांवर प्रश्न उपस्थित केले. 'हे विद्यार्थ्यांवरील सरकारचे दबावतंत्र' असेही ते म्हणाले. 'वकिलांची मोठी फौज उभी केली आहे' असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारला अध्यक्षांना हटवण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...