⚡ ब्रेकिंग News

'राहुल गांधी ज्यादिवशी पुण्यातील आंदोलनाला येतील तेव्हा...'; रोहित पवारांचा वेगळाच डाव, भाजप नेत्याने सांगितली थिअरी


'रोहित पवार राहुल गांधींच्या नजरेत येण्यासाठी धडपड करत आहेत'; 'ज्या दिवशी आंदोलनात राहुल गांधींचा प्रवेश होईल, त्याच दिवशी आंदोलन संपुष्टात येईल'; 'सुप्रिया सुळेंसोबत जमत नसल्याने रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत'; 'रोहिंग्यांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीच राहुल गांधींचे आंदोलन'; भाजप नेते परिणय फुकेंचे गंभीर आरोप

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) -  किरण देशमुख

नागपूर : रोहित पवार सध्या राहुल गांधींच्या नजरेत येण्यासाठी धडपड करत आहे. ज्या दिवशी पुण्याच्या एमपीएससीच्या आंदोलनात राहुल गांधींचा प्रवेश होईल, त्याच दिवशी रोहित पवारांचा आंदोलन संपुष्टात येईल, असा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. सुप्रिया सुळेसोबत रोहित पवारांचे जमत नसल्यामुळे रोहित पवार काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत, आणि त्याच अनुषंगाने राहुल गांधींची जवळीक वाढवण्यासाठी त्यांचे असे प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही फुकेंनी केलाय. तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून बंडखोरी करणारे अनिल सोले निश्चितच माघार घेतील, असा विश्वासही फुकेंनी व्यक्त केलाय. ते नागपुरात बोलत होते.

राहुल गांधी मतदार याद्यांमधून १३ कोटी नावे वगळले गेल्याचा आरोप करत असले, तरी त्यामध्ये जुन्या पत्त्यावरून कायमचे निघून गेलेल्यांची संख्या मोठी आहे. जुन्या पत्त्यावरून कायमच्या निघून गेलेल्यांमध्ये बांगलादेशी रोहिंग्यांची संख्या जास्त असून त्या रोहिंग्यांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीच राहुल गांधी यांचे आंदोलन सुरू असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केला आहे. सध्या भारताची प्रगती होत आहे, ती अनेक पाश्चिमात्य देशांना बघवत नाही, म्हणून राहुल गांधींना भारताला बदनाम करण्याची सुपारी देण्यात आल्याचा आरोपही फुकेंनी केलाय. काँग्रेस पक्षाच्या मागे अति डाव्यांचं डोकं असून राहुल गांधी दिमागी नक्षल सारखेच वागत असल्याचा आरोप ही फुकेंनी केलाय.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार एस. एम. जोशी पुलाजवळ एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या प्रमुख मागणीसाठी आंदोलनाला बसलेत आहेत. आज आंदोलनाचा सातवा आणि महत्त्वाचा दिवस आहे. दरम्यान एकीकडे रोहित पवार मैदानात असतानाच पुण्यात आणखी २ ठिकाणी एमपीएससी विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत. शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी अभ्यासिकेसमोर काही परीक्षार्थी आंदोलनाला बसलेत. ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं परीक्षा घ्यावी, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. तर अलका टॉकीज चौकात आंदोलन करणाऱ्या परीक्षार्थींना डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं परीक्षा व्हायला हवीय. त्यामुळे पेपरफुटीमुळे बेजार विद्यार्थ्यांना खरंच न्याय मिळणार की आंदोलनाची हवा नुसतीच विरून जाणार हे पाहावं लागेल.

परिणय फुकेंच्या आरोपानुसार, रोहित पवार सध्या राहुल गांधींच्या नजरेत येण्यासाठी धडपड करत आहेत. सुप्रिया सुळेसोबत त्यांचे जमत नसल्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच ते राहुल गांधींची जवळीक वाढवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप फुकेंनी केला आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी महाज्योती घोटाळ्याचाही उल्लेख केला आहे. आता महाज्योतीतही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे एमपीएससीच्या विश्वासार्हतेवर अधिक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतून बंडखोरी करणारे अनिल सोले निश्चितच माघार घेतील, असा विश्वासही फुकेंनी व्यक्त केलाय. यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील एमपीएससी आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. रोहित पवार एस. एम. जोशी पुलाजवळ आंदोलनाला बसले आहेत. भाजप नेते परिणय फुकेंनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. 'रोहित पवार राहुल गांधींच्या नजरेत येण्यासाठी धडपड करत आहेत' असे ते म्हणाले. 'ज्या दिवशी आंदोलनात राहुल गांधींचा प्रवेश होईल, त्याच दिवशी आंदोलन संपुष्टात येईल' असा आरोप केला. 'रोहिंग्यांना पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीच राहुल गांधींचे आंदोलन' असेही ते म्हणाले. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...