⚡ ब्रेकिंग News

वलवनमध्ये मध्यरात्री घरफोडी; ७० हजारांचे सोन्याचे झुमके लंपास!


बंद दरवाजाची कडी वाकवून घरात प्रवेश; अज्ञात चोरट्याविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

आटपाडी - आटपाडी तालुक्यातील वलवन येथे घरफोडीची घटना घडली असून, अज्ञात चोरट्याने घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली सुमारे ७० हजार रुपये किमतीची सोन्याच्या झुमक्यांची जोडी चोरून नेल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वलवन येथील शोभा सहदेव थोरात यांच्या घरी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाली. अज्ञात चोरट्याने घराच्या बंद दरवाजाची कडी वाकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेली १० ग्रॅम वजनाची, अंदाजे ७० हजार रुपये किमतीची सोन्याच्या झुमक्यांची जोडी चोरून नेली.

या प्रकरणी शोभा थोरात यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ३७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(अ) आणि ३३१(४) प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याची नोंद ८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस कर्मचारी मोहिते पुढील तपास करीत आहेत. आरोपीची ओळख आणि चोरीचा मुद्देमाल शोधण्याबाबत तपास सुरू आहे.

वलवनमधील या घरफोडीचा तपास आटपाडी पोलीस करीत असून, नागरिकांनी घराच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी घ्यावी.




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...