क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
नवी दिल्ली / मुंबई - देशात यावर्षी सरासरीपेक्षा १३ टक्के पाऊस कमी झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. २०२६ च्या मान्सूनमध्ये देशभरात ८७ टक्के पाऊस झाला आहे.
देशात जून ते सप्टेंबरदरम्यान ७५९.४ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. २००१ नंतरचा चौथा, तर १९०१ नंतरचा १३ वा सर्वात कमी पाऊस झाला आहे.
ईशान्य भारतात १९०१ नंतरचा सर्वात कमी पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे.
दक्षिण द्वीपकल्पात १९०१ नंतरचा चौथा सर्वात कमी पाऊस झाला आहे.
मध्य भारतात मात्र सामान्य पावसाची नोंद झाली आहे.
देशातील ३६ पैकी १७ हवामान विभागांमध्ये पावसाची तूट झाली आहे. १८ हवामान विभागांमध्ये सामान्य पाऊस, ओडिशात अतिवृष्टी असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मान्सून कोअर झोनमध्ये ७७९.९ मिमी पाऊस झाला आहे. सामान्य पावसाच्या किमान मर्यादेपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
| महिना | पाऊस |
| जून | ६५ टक्के |
| जुलै | १०१ टक्के |
| ऑगस्ट | ८४ टक्के |
| सप्टेंबर | ९२ टक्के |
१६ मे रोजी अंदमान-निकोबारमध्ये मान्सूनचे आगमन झाले होते.
तर ४ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता.
तर ९ जुलैपर्यंत संपूर्ण देश मान्सूनने व्यापला होता.
१९ सप्टेंबरपासून राजस्थानातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रात देखील बहुतांश भागात पाऊसच झाला नाही. सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचे चारही महिने कोरडेच गेले आहेत.
दीड महिने तर राज्यातील अनेक भागांत पावसाचा एक थेंबही पडला नाही.
काही ठिकाणी पाऊस झाला, पण तोही समाधानकारक नव्हता.
त्यामुळे राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे.
हवामान खात्याच्या दाव्यानुसार, एक दशकानंतर राज्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यावरुन राज्यातील संकट किती मोठं आहे, हे दिसून येतं.
पाऊस कमी झाल्याने रब्बी पेरणीवरही संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.
एक दशकानंतर राज्यात या वर्षी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा राज्यातील पावसाची सरासरी तूट १८ टक्के आहे.
राज्यातील सर्वच विभागांत यावर्षी पावसाची कमी-जास्त प्रमाणात तूट निर्माण झाली आहे.
मात्र, येणाऱ्या ५ ते ६ दिवसांत राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची कमी शक्यता आहे.
असं असलं तरी राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊनच रब्बी हंगामात पेरणी करावी, असा सल्ला एस.डी. सानप यांनी दिला आहे.
| मुद्दा | तपशील |
| देशातील पाऊस | ८७ टक्के; १३% तूट |
| एकूण पाऊस | ७५९.४ मिमी |
| १९०१ नंतर | १३ वा सर्वात कमी |
| ईशान्य भारत | १९०१ नंतरचा सर्वात कमी |
| दक्षिण द्वीपकल्प | १९०१ नंतरचा चौथा सर्वात कमी |
| मध्य भारत | सामान्य |
| तूट विभाग | १७ (३६ पैकी) |
| जून | ६५% |
| जुलै | १०१% |
| ऑगस्ट | ८४% |
| सप्टेंबर | ९२% |
| महाराष्ट्र | एक दशकानंतर सर्वात कमी; १८% तूट |
| परती | १९ सप्टेंबर, राजस्थान |

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.