⚡ ब्रेकिंग News

'धर्मवीर 3' कधी येणार? एकनाथ शिंदेंची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्यानं थेटच सांगून टाकलं; क्षितीश दाते म्हणाला...


   'मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे याचं उत्तर देऊ शकतील'; 'सध्या मुळशी पॅटर्न 2 चं लेखन सुरू'; 'कथानकाचे धागेदोरे अत्यंत दमदार'; 'पहिल्या भागाला साजेसा अन् त्याहून मोठा अनुभव देणारा सिनेमा'; 'प्रवीण यांचा सिनेमा हा माझा सिनेमा'

क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे

मुंबई - मराठी सिनेसृष्टीला (Marathi Entertainment World) सध्या सुगीचे सिनेमे आलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 'राजा शिवाजी' (Raja Shivaji), 'दशावतार' (Dashavatar), 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) यांसारख्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) पुरता धुरळा उडवून दिलाय.

तर, 'गोंधळ' (Gondhal Marathi Movie) या मराठी सिनेमानं (Marathi Movie) 'धुरंधर' सारख्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या सिनेमाला पछाडून थेट ऑस्करचं तिकीट मिळवलंय.

अशातच आता प्रेक्षक काही सिनेमांच्या सीक्वेलची आतुरतेनं वाट पाहत आहेत. 'देऊळ बंद 2' नं १०० कोटींचा टप्पा पार करुन तुफान कमाई केल्यानंतर त्याच्या पुढच्या पार्टीची चर्चा रंगली.

अशातच एका मुलाखतीत बोलताना दिग्दर्शक प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांनी 'मुळशी पॅटर्न 2' ची (Mulshi Pattern 2) तयारी सुरू केल्याचे संकेत दिलेले.

त्यासोबतच, प्रवीण तरडे दिग्दर्शित करत असलेला 'धर्मवीर 3' (Dharmaveer 3) कधी येणार याचीही प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. अशातच 'धर्मवीर' फेम अभिनेता क्षितीश दातेनं यावर दिलेल्या प्रतिक्रियेनं सर्वांचं लक्ष वेधलंय.

'धर्मवीर'मध्ये एनाथ शिंदेंच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता क्षितीश दातेनं 'महाराष्ट्र टाईम्स' ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना 'धर्मवीर 3' सिनेमाबाबत वक्तव्य केलंय. त्याच्या वक्तव्यानंतर 'धर्मवीर 3'च्या चर्चा सुरू झाल्यात.

'धर्मवीर' मुलाखतीत बोलताना अभिनेता क्षितीश दातेला 'धर्मवीर 3' कधी येणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्यानं सविस्तर उत्तर दिलं.

क्षितीश दाते म्हणाला की, "मंगेश देसाई आणि प्रवीण तरडे याचं उत्तर देऊ शकतील. पण प्रवीण तरडे यांच्यासोबत सध्या 'मुळशी पॅटर्न 2'चं लेखन सुरू आहे आणि त्यांनी जे काही कथानकाचे धागेदोरे ऐकवले आहेत, ते अत्यंत दमदार आहेत."

"पहिल्या भागाला साजेसा आणि कदाचित त्याहून मोठा अनुभव देणारा हा सिनेमा ठरू शकतो," असंही क्षितीश दाते म्हणाला.

क्षितीश दाते पुढे बोलताना म्हणाला की, "'देऊळ बंद' सिनेमालिकेच्या पुढील भागांबाबतही चर्चा सुरू आहे. प्रवीण यांना एखादी कल्पना भावली की, ती पटकन आकार घेते."

"त्यांच्या सिनेमात मी प्रत्यक्ष काम करत असो वा नसो, त्यांचा सिनेमा हा माझा सिनेमा आहे."

"'धर्मवीर' सारख्या यशस्वी सिनेमानंतर त्यांच्याकडे अनेक प्रकल्प आहेत आणि अनेक जण त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. येत्या काळात त्यांच्या दिग्दर्शनातून आणि लेखणीतून अनेक महत्त्वाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येतील, याची खात्री वाटते."

"अभिनेता म्हणून मला सातत्यानं त्यांच्यासोबत विविधांगी व्यक्तिरेखा साकारायच्या आहेत..."

अभिनेता क्षितीश दाते यानं आजवर अनेक नाटकं, मालिका आणि सिनेमांमधून आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना भुरळ घातलीय.

सध्या क्षितीश दाते त्याचा आगामी सिनेमा 'पाच फुटाचा बच्चन' मुळे प्रसिद्धीझोतात आलाय.

तसेच, त्यापूर्वी 'धर्मवीर', 'मुळशी पॅटर्न' यांसारख्या ब्लॉकबस्टर ठरलेल्या सिनेमांमधून क्षितीश दाते घराघरांत पोहोचलाय.

| मुद्दा | तपशील |

| प्रश्न | धर्मवीर ३ कधी येणार? |

| उत्तर देणारा | क्षितीश दाते |

| म्हणणे | मंगेश देसाई, प्रवीण तरडे सांगतील |

| सध्या | मुळशी पॅटर्न २ चं लेखन |

| कथानक | अत्यंत दमदार |

| सिनेमा | पहिल्या भागापेक्षा मोठा अनुभव |

| प्रवीण तरडे | अनेक प्रकल्प |

| क्षितीश दाते | 'पाच फुटाचा बच्चन' |




Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...