क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
आपल्या नगरपंचायतीमध्ये स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी आणि इतर बाह्यस्रोत (कंत्राटी) कर्मचारी रोज न थकता शहराची सेवा करत आहेत. अस्वच्छतेच्या ठिकाणी काम करत असल्याने त्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असते.तरी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करून पुढील सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात,
२. सुरक्षा साधने (Safety Kits): कचरा उचलणाऱ्या व ड्रेनेज लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातमोजे, गमबूट, मास्क आणि रेनकोट देण्यात यावेत.
३. आरोग्य विमा / Mediclaim: कर्मचाऱ्यांना आजारपणाच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी म्हणून आरोग्य विमा किंवा विशेष वैद्यकीय निधीची तरतूद करावी.
४. लसीकरण: सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना टायफॉइड, कावीळ आणि टिटॅनस (Tetanus) च्या प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात याव्यात.सदर बाबी अत्यंत संवेदनशील असून कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहिल्यास ते अधिक सक्षमपणे आपले कर्तव्य पार पाडू शकतील. यावर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा.

Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.