⚡ ब्रेकिंग News

आय.आर.एस. सचिन मोटे आणि अक्षय अर्जुन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; भाजप पदाधिकारी विकास कांबळे यांची मागणी

 

आय.आर.एस. सचिन मोटे आणि अक्षय अर्जुन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा; भाजप पदाधिकारी विकास कांबळे यांची मागणी

​विटा :

भिवघाट येथील सिद्धिविनायक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये सोशल मीडियावरील पोस्टच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी, आय.आर.एस. सचिन मोटे आणि अक्षय अर्जुन यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे खानापूर तालुका सोशल मीडिया प्रमुख विकास कांबळे यांनी केली आहे. विटा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा गंभीर आरोप केला.

विकास कांबळे हे आपल्या आईच्या वैद्यकीय तपासणीसाठी भिवघाट येथील सिद्धिविनायक सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये गेले होते. दरम्यान, मेडिकलमध्ये औषधे घेत असताना अक्षय अर्जुन तिथे आले आणि त्यांना डॉक्टरच्या केबिनमध्ये बोलवले. कांबळे यांनी सुरुवातीला मेडिकल जवळच बोलण्यास सांगितले, परंतु आग्रहाखातर ते केबिनमध्ये गेले. तेथे आय.आर.एस. सचिन मोटे व इतर काही व्यक्ती उपस्थित होत्या.

​कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सचिन मोटे यांनी 'तू सोशल मीडियावरून आमच्या विरोधात पोस्ट का करतोस? तू चांभाराचा आहेस, आमच्यातले भांडण आम्ही मिटवून घेऊ, तू मध्ये वळवळ करू नकोस,' अशा शब्दांत जातीवाचक अपमान केला. तसेच, 'आमचा इतिहास पाहिला तर चांगल्या चांगल्यांची जिरवली आहे,' असे म्हणत आईवरून शिवीगाळ करत दम दिला. या प्रकारामुळे आपला जातीवाचक अपमान झाला असून, संबंधित दोघांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे.

या पत्रकार परिषदेत भाजपच्या जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यावर होणारा जातीवाचक अपमान किंवा दमदाटी भारतीय जनता पार्टी खपवून घेणार नाही, असे सांगत, जे कोणी अन्याय करत असतील त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संग्राम माने आणि तालुकाध्यक्ष दाजी पवार यांनी दिला.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...