⚡ ब्रेकिंग News

म्हसवडमध्ये अवैध हातभट्टीवर धाड; १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

म्हसवडमध्ये अवैध हातभट्टीवर धाड; १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

​म्हसवड :

म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेमळा परिसरात अवैधपणे हातभट्टीची दारू तयार करणाऱ्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी निलेश बाळू जाधव (रा. म्हसवड) याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, १५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी रात्री ८:३० च्या सुमारास म्हसवड गावच्या हद्दीतील शिंदेमळा येथे ओढ्याच्या कडेला आरोपी निलेश जाधव हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू तयार करत होता. स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पोलीस हवालदार सनि सुरेश आवटे यांनी या परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी १०५ लिटर तयार हातभट्टी दारू आणि ५०० लिटर दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे आंबट-गोड वास येणारे रसायन असा एकूण १५,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तपासासाठी पोलिसांनी रसायनाचे नमुनेही (सॅम्पल्स) घेतले आहेत.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कुंभार हे करत आहेत. आरोपी निलेश जाधव याच्यावर यापूर्वीही म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...