⚡ ब्रेकिंग News

भोंदूबाबाअशोक खरातची कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढली; न्यायालयाने SIT ची मागणी मान्य केली

 महिलांवरील अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपीच्या तपासात नवी रहस्ये समोर येण्याची शक्यता

नाशिक – संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने आज (शनिवार) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. आरोपी अशोक खरात याची पोलीस कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे. न्यायालयाने तपासाची व्याप्ती आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, तपास यंत्रणेला (SIT) अधिक कालावधीची गरज असल्याचे मान्य केले.

 न्यायालयात नेमकं काय घडलं?

आज सकाळी ११.३० वाजता अशोक खरातला कडक पोलीस बंदोबस्तात न्यायमूर्ती श्रीमती एम. व्ही. भराडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी एसआयटीचे तपासी अधिकारी किरण सूर्यवंशी आणि सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी खरातच्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.

सरकारी पक्षाने न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटले की, “आरोपी तपासात सहकार्य करत नसून त्याच्या मोबाईलमध्ये अनेक नावे ‘डमी’ किंवा ‘कोडवर्ड’मध्ये सेव्ह केल्याची शक्यता आहे. यामध्ये काही राजकीय व्यक्तींचाही समावेश असू शकतो. तसेच, पीडित महिलांना तो जे ‘द्रव्य’ किंवा पाणी पाजत होता, त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.”

दुसरीकडे, आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला जोरदार विरोध केला. “मोबाईल जप्त करून त्याची क्लोन कॉपी मिळाली आहे. रिव्हॉल्व्हरचा परवानाही आरोपीकडे होता. अशा स्थितीत पुन्हा कोठडीची गरज काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मात्र, पीडित महिलेचे वकील एम. वाय. काळे यांनी याला आक्षेप घेत सांगितले की, “आरोपीच्या कृत्यामुळे पीडितेचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून समाजाला न्याय मिळण्यासाठी पोलीस कोठडी अत्यंत आवश्यक आहे.”

तपासाची व्याप्ती आणि १० गुन्हे दाखल

अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १० गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ८ गुन्हे महिलांवरील अत्याचाराचे असून २ गुन्हे आर्थिक फसवणुकीचे आहेत. एसआयटीने न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून नवनवीन पीडित महिला आता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत.

खरतचा मोबाईल डेटा रिकव्हर करणे आणि त्याच्या जंगम मालमत्तेचा शोध घेण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. फॉरेन्सिक टीमकडून डेटा रिकव्हरी सुरू असून, या माहितीच्या आधारे खरातची समोरासमोर चौकशी करणे गरजेचे असल्याचे तपास यंत्रणेने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

अशोक खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

या हायप्रोफाइल प्रकरणामुळे आज नाशिक जिल्हा न्यायालय परिसरात पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तपासाची व्याप्ती आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अशोक खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपासादरम्यान खरात आणखी कोणाची नावे घेतो आणि त्याच्या ‘कोडवर्ड’चे रहस्य काय आहे, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...